Vice President Election: एनडीएचं ठरलं! उपराष्ट्रपतीपदाचा चेहरा मोदी आणि नड्डा ठरवणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Vice President Election: आरोग्याचे कारण देऊन राजीनामा दिलेले मावळते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष होते.
नवी दिल्ली : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे उपराष्ट्रपतीपद आता रिक्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता होती. अखेर उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याची जबादारी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये आज एनडीएची एक महत्त्वाची बैठक पडली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संपूर्ण एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिले आहेत. एनडीएतील सर्व घटक पक्ष या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला आहे.
NDA authorises PM Modi, BJP president J P Nadda to pick the alliance's Vice President candidate. pic.twitter.com/zO5NY5V4SC
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2025
advertisement
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच 8 सप्टेंबरला एनडीएची आणखी एक मोठी बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे: (Vice President Election Scheduled)
7 ऑगस्ट: निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर
21 ऑगस्ट: उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
25 ऑगस्ट: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
9 सप्टेंबर: मतदान सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडणार; त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी
advertisement
उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतात. सद्यस्थितीत दोन्ही सभागृहांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) बहुमत असल्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी पक्षासाठी फारशी अवघड ठरण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एनडीए उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे भाजपाच्या रणनीती आणि उमेदवाराच्या नावावर उत्सुकतेचं वातावरण आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 07, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/देश/
Vice President Election: एनडीएचं ठरलं! उपराष्ट्रपतीपदाचा चेहरा मोदी आणि नड्डा ठरवणार


