'आता कुणालाही त्रास द्यायचा नाही', मुलाच्या आजारपणाने खचली आई, शेवटच्या चिठ्ठीने सगळ्यांचे डोळे पाणावले
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
37 वर्षांच्या महिलेने तिच्या 11 वर्षांच्या मुलासह 13व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
37 वर्षांच्या महिलेने तिच्या 11 वर्षांच्या मुलासह 13व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उडी मारल्यानंतर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. टोकाचं पाऊल उचलण्याआधी महिलेने घरामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली, ज्यात तिने तणावामुळे आयुष्य संपवत असल्याचं म्हटलं आहे. महिलेच्या मुलावर न्युरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डरसाठी उपचार सुरू होते, असं वृत्त इंडिया टुडने दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती चार्टर्ड अकाउंटंट आहे. महिलेने मुलासह बाल्कनीतून उडी मारली तेव्हा तो दुसऱ्या खोलीमध्ये होता. आरडाओरडा ऐकल्यानंतर महिलेचा पती बाल्कनीच्या दिशेने धावला, तेव्हा त्याला पत्नी आणि मुलगा जमिनीवर पडलेले आढळले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
महिलेने लिहिलेली चिठ्ठी ही तिच्या पतीला उद्देशून असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा निर्णय घेण्यासाठी महिलेने कुणालाही जबाबदार धरलेलं नाही. आता आपल्याला कुणालाही त्रास द्यायचा नाही, असं महिला तिच्या चिठ्ठीमध्ये म्हणाली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आई मुलाबद्दल अत्यंत चिंतेत होती. वडिलांनी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पत्नीला मुलाला औषध द्यायला सांगितलं होतं, असंही पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. नोएडामध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
September 14, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/देश/
'आता कुणालाही त्रास द्यायचा नाही', मुलाच्या आजारपणाने खचली आई, शेवटच्या चिठ्ठीने सगळ्यांचे डोळे पाणावले