Mamata Banerjee : मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात, कपाळावर मोठी दुखापत
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा अपघाता झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा मोठा अपघाता झाला आहे. यामध्ये त्यांना कपाळावर मोठी दुखापत झाली आहे. तृणमुल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे.
Our chairperson @MamataOfficial sustained a major injury.
Please keep her in your prayers pic.twitter.com/gqLqWm1HwE— All India Trinamool Congress (@AITCofficial) March 14, 2024
कसा झाला अपघात?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या आहेत. दुखापतीनंतर, गुरुवारी संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमोला गंभीर अवस्थेत कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री संध्याकाळी घरी ट्रेडमिलवर चालत असताना कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
Location :
Kolkata,West Bengal
First Published :
March 14, 2024 8:24 PM IST
मराठी बातम्या/देश/
Mamata Banerjee : मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात, कपाळावर मोठी दुखापत