New Hit-and-Run Law : काय आहे नवा 'हिट अँड रन' कायदा? ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करतायंत विरोध
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
गुन्हेगारी कायद्यातील बदलांमुळे हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे. ज्यामुळे देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे.
मुंबई, औपनिवेशिक काळातील गुन्हेगारी कायद्यातील बदलांमुळे हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये दिली जाणारी शिक्षा आता वाढली आहे. ज्यामुळे देशभरातील ट्रक ड्रायव्हर्स आणि बस ड्रायव्हर्सकडून याचा निषेध व्यक्त होत आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता.
हिट अँड रनच्या नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचे खासगी बसचालक एकवटले असून ते आज संपावर गेले आहेत, तर ऑटोचालकांनीही नव्या कायद्याविरोधात मोर्चा उभारलाआहे. नवीन कायदा हा चालकांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करेल तसेच नवोदित ड्रायव्हर्सना सुद्धा या क्षेत्रामध्ये नोकऱ्या घेण्यापासून परावृत्त करू शकेल असा आरोप ट्रकचालक करतात.
advertisement
ट्रक चालकांचे म्हणणे आहे की, “कोणीही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात घडवत नाही, तसेच जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यास तेथे जमलेला जमाव त्यांना मारहाण करेल”, तेव्हा ट्रक चालक संघटनांकडून हा ‘काळा कायदा’ रद्द करण्याची मागणी केली जात आहे. तसेच अनेकदा वातावरणात धुक्याची चादर पसल्याने गाडी चालकांना समोरचे दृश्य दिसत नाही, अशावेळी अनेक अपघात होतात. परंतु या परिस्थितीमुळे जर चालकाच्या हातून अपघात झाला तरी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली जाऊ शकते, अशी भीतीही ट्रक आणि बसचालकांनी व्यक्त केली.
advertisement
केंद्राच्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खासगी आणि रोडवेज बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बस सुरू करणार नसल्याचे बसचालक कुलदीप सिंग मान यांनी सांगितले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
advertisement
ट्र्क ड्रायव्हर्सच्या संपामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान :
ट्रक संपामुळे हनुमानगड ते अबोहर आणि संगरिया ते श्रीगंगानगर, चित्तोडगड यासह अनेक मार्गांवर रस्ते आणि खाजगी बस वाहतूक बंद आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.व्यापारी दीपक खुराणा यांनी सांगितले की, येथे किन्नूचे बंपर पीक आले आहे. तसेच हे पीक 5 ते 6 दिवसात खराब होतो अशावेळी ट्रक ड्रायव्हर्सच्या संपामुळे नुकसान होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 01, 2024 5:17 PM IST
मराठी बातम्या/देश/
New Hit-and-Run Law : काय आहे नवा 'हिट अँड रन' कायदा? ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करतायंत विरोध