बसपा प्रमुख मायावतींनी लग्न का नाही केलं? IAS व्हायचं होतं पण आल्या राजकारणात
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची 3 जून 1955 रोजी त्यांनी शपथ घेतली. तेंव्हा त्या देशातल्यापहिल्या दलित मुख्यमंत्री ठरल्या.
बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती आज (15जानेवारी2024) 68वर्षांच्या झाल्या. एक शिक्षिका ते मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास सोपा नाही. मायावती यांच्या राजकीय भूमिका,जोरदार भाषणं,त्यांचं राहणीमान,बारीक कापलेले केस अशा अनेक गोष्टींमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. राजकारणात येण्यापूर्वी त्या एका शाळेत शिक्षिका होत्या. खरं तर त्यांना आयएएस ॲाफिसर व्हायचं होतं पण1984मध्ये शिक्षिकेची नोकरी सोडून त्या थेट राजकारणात आल्या.
advertisement
उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची 3 जून 1955 रोजी त्यांनी शपथ घेतली. तेंव्हा त्या देशातल्यापहिल्या दलित मुख्यमंत्री ठरल्या. मायावती एक राजकारणी म्हणून चर्चेच असतातच पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि आवडीनिवडींबद्दलही सगळ्यांना कुतूहल असतं. त्या अविवाहित आहेत. याबद्दल एका इंटरव्यूमध्ये त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक बहुजन नेत्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला असता मला असं वाटलं की ही माणसं आता नाहीत. त्यामुळे त्यांची स्वप्न आपण पूर्ण करायला हवीत. त्यासाठी संपूर्ण समर्पण आवश्यक आहे. त्यामुळे मी अविवाहित राहायचा निर्णय घेतला.’
advertisement
1995मध्ये त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. या पदावर त्या अल्पकाळ राहिल्या. यानंतर 1996मध्ये त्यांनी दोन जागांवर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्याही. यानंतर 1997मध्ये त्या पुन्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. 1977मध्ये मायावती बसपचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांच्या संपर्कात आल्या आणि बहुजन चळवळीशी जोडल्या गेल्या. त्यानंतर त्यांना राजकारणात रस वाटू लागला. मात्र,आपल्या मुलीने राजकारणात येणं त्यांच्या वडिलांना पटलेलं नसल्यामुळे मायावतींनी घर सोडलं.
advertisement
राजकारणात त्यांची सुरुवात फार चांगली म्हणावी अशी नाही. पहिल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. 1984मध्ये बहुजन समाज पक्ष स्थापनेनंनतर त्या पक्षाच्या कोअर टीममध्ये आल्या. 1984मध्ये त्यांनी पहिल्यांदा कैराना इथून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या पडल्या. 1985मध्ये बिजनौर आणि 1987मध्ये हरिद्वारमधून लढल्यावरही त्यांना पराभवच पत्करावा लागला. 1989मध्ये बिजनौरमध्ये पोटनिवडणुकीत त्या यशस्वी झाल्या. 1991मध्ये पुन्हा बिजनौर आणि हरिद्वारमधून लोकसभेसाठी उभ्या राहिल्या असता त्यांचा पराभव झाला. 1994मध्ये त्या राज्यसभेत पोहोचल्या. 2002-2003या काळात भाजपबरोबर युती करुन मायावती तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. 2012मध्ये त्यांनी बहुमताचं सरकार आणलं आणि 2017पर्यंत त्या मुख्यमंत्री राहिल्या.
advertisement
मायावती त्यांच्या शॅार्ट हेअरकटसाठी ओळखल्या जातात. एका मुलाखतीत त्यांना याबद्दल विचारलं असता केस मोठे असतील तर सारखे विंचरुन ते नीट करावे लागतात. मी रोज सहा सात ठिकाणांचे दौरेकरते. प्रत्येकवेळी केस नीट करायचे तर खूप वेळ वाया जातो,म्हणून केस बारीक कापल्याचं मायावती यांनी सांगितलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2024 4:52 PM IST









