पत्नी छातीवर बसली, बॉयफ्रेंड Private Part वर... झोपलेल्या पतीसोबत मध्यरात्री भयानक घडलं

Last Updated:

1 सप्टेंबरची मध्यरात्र... एक व्यक्ती भाड्याच्या घरात शांत झोपला होता, पण कुणीतरी आपला गळा दाबतंय हे त्याला जाणवलं आणि तो खडबडून जागा झाला.

पत्नी छातीवर बसली, बॉयफ्रेंड Private Part वर... झोपलेल्या पतीसोबत मध्यरात्री भयानक घडलं
पत्नी छातीवर बसली, बॉयफ्रेंड Private Part वर... झोपलेल्या पतीसोबत मध्यरात्री भयानक घडलं
1 सप्टेंबरची मध्यरात्र... एक व्यक्ती भाड्याच्या घरात शांत झोपला होता, पण कुणीतरी आपला गळा दाबतंय हे त्याला जाणवलं आणि तो खडबडून जागा झाला. गळा दाबणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणीही नसून त्याचीच पत्नी होती. बिरप्पा पुजारी हा त्याच्या भाड्याच्या घरात शांत झोपला होता, तेव्हा पत्नी बिरप्पाचा गळा दाबत होती आणि दुसरा माणूस त्याच्या पायाजवळ बसून गुप्तांगावर काठीने मारत होता.

'त्याला संपव. सोडू नकोस, सिद्धू'

बिरप्पाने डोळे उघडले तेव्हा त्याला घरातील सर्व दिवे बंद असल्याचं दिसलं, यानंतर त्याचा पाय कूलरवर आदळला आणि मोठा आवाज झाला. या आवाजामुळे बिरप्पाचा जीव वाचला. बिरप्पाची पत्नी सुनंदा त्याच्या छातीवर बसली होती, तर सुनंदाचा प्रियकर बिरप्पाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत होता. त्याला संपवून टाक, सिद्धू त्याला सोडू नकोस, असं सुनंदा प्रियकराला सांगत होती.
advertisement

घरमालकाने वाचवला बिरप्पाचा जीव

हा आवाज ऐकून घरमालक मल्लिकार्जुन सुतार आणि त्याची पत्नी राजेश्वरी घराबाहेर आले आणि त्यांनी दार वाजवायला सुरूवात केली. बिरप्पाचा मुलगा राकेशने रडत दार उघडले, त्यानंतर सुनंदा धावत बाहेर आली आणि घरमालकाला घरात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तसंच त्याला घराबाहेरही ढकललं. बिरप्पाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करणारा व्यक्ती सिद्धप्पा कटनकेरी असल्याचं नंतर समोर आलं.
advertisement

सुनंदाचे अनैतिक संबंध

बिरप्पाची पत्नी सुनंदाचे सिद्धप्पासोबत अनैतिक संबंध असल्याचं तपासात समोर आलं आहे. अनैतिक संबंधांमुळे सुनंदाचे बिरप्पासोबत घरात वारंवार वाद व्हायचे. बिरप्पाची हत्या करण्यासाठी सुनंदा आणि सिद्धप्पासोबत आणखी एक व्यक्ती होती, ज्याने कापडाने स्वत:चा चेहरा झाकला होता. यावेळी तू वाचलास, पण पुढच्यावेळी तूला मारून टाकू, असं म्हणून तो व्यक्ती तिथून पळून गेला.
advertisement
या हल्ल्यामध्ये वीरप्पा गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेला आणि गुप्तांगांना दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर बिरप्पाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुनंदाला अटक केली असून तिचा प्रियकर फरार आहे.
कर्नाटकच्या विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबर्गी यांच्या देखरेखीखाली सिद्धप्पा याचा शोध पोलीस घेत आहेत. तसंच वीरप्पाची हत्या करण्यासाठी आलेली तिसरी व्यक्ती कोण होती? याचं गूढही अजून उकललेलं नाही.
मराठी बातम्या/देश/
पत्नी छातीवर बसली, बॉयफ्रेंड Private Part वर... झोपलेल्या पतीसोबत मध्यरात्री भयानक घडलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement