advertisement

फोनमध्ये 4G, LTE की 5G? चुकीच्या नेटवर्क मोडमुळे खर्च होतेय जास्त बॅटरी

Last Updated:

4G LTE 5G: आजच्या काळात स्मार्टफोन फक्त कॉल करण्याचं साधन नाही तर काम, शिक्षण, गेमिंग आणि एंटरटेनमेंटचा मुख्य माध्यम बनला आहे.

टेक न्यूज
टेक न्यूज
4G LTE 5G: सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगतात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या लाइटबीलपासून तर बकिंग डिटेल्स, फोटोज, ऑफिसची महत्त्वाची कामं सर्वच एका लहानशा स्मार्टफोनमध्ये येऊन विसावलं आहे.  मात्र अनेकदा लोकांना समजत नाही की, त्यांच्या फोनमध्ये कोणतं नेटवर्क मोड ऑन आहे आणि तिच सेटिंग इंटरनेट स्पीड आणि बॅटरी बॅकअपवर थेट परिणाम टाकते. नेटवर्क मोड योग्य निवडले नाही तर वेगवान इंटरनेटच्या जागी तुम्हाला स्लो स्पीड आणि लवकर संपणारी बॅटरी मिळू शकते.
4G आणि LTE मध्ये काय फरक?
अनेकदा लोक 4G आणि LTE ला वेगवेगळं समजतात. तर खऱ्या अर्थाने LTE (Long Term Evolution)  ही 4G टेक्निकचा एक प्रगत रुप आहे. जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये 4G दिसो किंवा LTE दोन्हीचा हेतू हाय-स्पीड डेटा देणेच असते. तुमच्या परिसरात 5G उपलब्ध नसेल तर 4G/LTE मोड एक स्थिर आणि बॅलेंस्ड पर्याय सिद्ध होतो.
advertisement
5G
5G नेटवर्क शानदार स्पीड देते विशेषतः चांगले कव्हरेच असलेल्या मोठ्या शहरांमध्ये. मूव्ही डाउनलोड, क्लाउड गेमिंग आणि हेवी फाइल स्ट्रान्सफरसाठी 5G बेस्ट आहे. मात्र सिग्नल कमकुवत असल्यावर प्रॉब्लम होतो. अशा परिस्थितीत फोन वारंवार 4G आणि 5G दरम्यान स्विच करतो ज्यामुळे बॅटरी वेगाने कमी होते.
advertisement
Jio आणि Airtel सारखे टेलिकॉम ऑपरेटर भारतात 5G सेवा देत आहेत, परंतु त्यांची क्वालिटी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये एकसारखी नाही. म्हणूनच, फक्त 5G चालू असणे नेहमीच शहाणपणाचे नसते.
बॅटरी बॅकअपवर नेटवर्कचा परिणाम 
तुम्ही अशा परिसरात राहता जिथे 5G सिग्नल कमकुवत असेल तर 5G Auto किंवा फक्त 5G मोड बॅटरी जास्त खर्च करेल. तेथेच 4G/LTE मोडवर फोन जास्त स्थिर राहतो आणि पॉवर कमी लागते. विशेषतः ऑफिस, घर किंवा प्रवासादरम्यान जिथे कव्हरेज अनिश्चित असेल. तिथे 4G मोड बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.
advertisement
तुम्ही कोणती सेटिंग निवडावी?
तुमच्या शहरातील 5G ​​कव्हरेज मजबूत आणि स्थिर असेल, तर 5G ऑटो मोड आदर्श आहे. तसंच, नेटवर्क वारंवार बदलत असेल किंवा तुमची बॅटरी लवकर संपत असेल, तर 4G/LTE वर स्विच करणे शहाणपणाचे ठरेल. सर्वोत्तम नेटवर्क मोड तुमच्या लोकेशन आणि गरजांवर अवलंबून असतो. काही सेटिंग्ज बदलून, तुम्ही चांगला इंटरनेट स्पीड आणि जास्त बॅटरी लाइफ दोन्ही मिळवू शकता.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/टेक्नोलॉजी/
फोनमध्ये 4G, LTE की 5G? चुकीच्या नेटवर्क मोडमुळे खर्च होतेय जास्त बॅटरी
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement