advertisement

Mahayuti Press Conference : महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, विरोधकांच्या आरोपांना उत्तर

Last Updated:

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना महायुतीच्या पत्रकार परिषदेत उत्तर देण्यात आलं. राज्य सरकारच्या दोन वर्षातील कामाचा अहवाल सादर करण्यात आला.

News18
News18
मुंबई : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. गेल्या दोन वर्षात महायुतीनं काय केलं याचं रिपोर्ट कार्डचं उद्घाटन करण्यात आलं.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना महायुतीच्या पत्रकार परिषदेत उत्तर देण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक असं वातावरण आहे. पैसे येणार नाही असा आरोप विरोधकांनी केला. काहीही आरोप करण्यात आले. आरोप करण्याचा अधिकार आहे पण त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं.
advertisement
फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. निवडणुका दोन, तीन टप्प्यात घेतल्या जातील अशा चर्चा विरोधकांनी सुरू केल्या. पण निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेतं आणि ते स्वायत्त आहेत. त्यांचे निर्णय ते घेतात असंही अजित पवार यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधक घाबरले नाहीत तर ते गडबडले आहेत असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
advertisement
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलीय. २४४ ते २४५ जागांचं वाटप झालं आहे. फक्त ४३ ते ४४ जागांचा तिढा असून तो एकाच बैठकीत सोडवला जाणार असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितलंय.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/Maharashtra Assembly Elections/
Mahayuti Press Conference : महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, विरोधकांच्या आरोपांना उत्तर
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement