Pm Modi Speech: पहलगाम हल्ल्याआड दहशतवाद्यांचा होता मोठा कट, पंतप्रधान मोदींनी संसदेत पहिल्यांदाच सांगितलं
- Published by:Sachin S
Last Updated:
. ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा ज्यांचा धर्म विचारून गोळ्या मारल्या हे क्रुर कार्य होतं. भारतात दंगली भडकवण्याचा कट होता.
दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूरमध्ये लोकांनी साथ दिली आशिर्वाद दिला, मी जनतेचा आभारी आहे. मी जनतेचं अभिनंदन करतो. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये ज्या प्रकारे क्रुर घटना घडली. ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा ज्यांचा धर्म विचारून गोळ्या मारल्या हे क्रुर कार्य होतं. भारतात दंगली भडकवण्याचा कट होता. मी जनतेचा आभारी आहे, त्यांनी एकता दाखवून हा कट हाणून पाडला, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आधार मानले.
पहलगाम हल्ला, केंद्र सरकारने राबविलेले ऑपरेशन सिंदूरवर संसदेत वादळी चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं. आता पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर दिलं आहे.
"मी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलत होतो, तेव्हा सगळ्या सदस्यांना विनंती केली होती की, हे सत्र भारतीय विजयाचा उत्सव आहे. संसदेचं हे अधिवेशन गौरव सांगण्यासाठी होतं. मी जेव्हा विजय उत्सवाचा उल्लेख करत होतो, दशतवाद्यांचं हेड क्वार्टर उदध्वस्त करण्यासाठी विजयोत्सव होता. भारतीय सैन्याच्या विजय गाथा होती. १४० कोटी भारतीयांची एकता आणि इच्छाशक्तीसाठी विजयोत्सव होता. मीच या विजय भावाने या संसदेत भारताचा पक्ष ठेवण्यासाठी इथं उभा आहे. ज्यांना भारताचा पक्ष दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी मी इथं उभा आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये लोकांनी साथ दिली आशिर्वाद दिला, मी जनतेचा आभारी आहे. मी जनतेचं अभिनंदन करतो. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये ज्या प्रकारे क्रुर घटना घडली. ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांचा ज्यांचा धर्म विचारून गोळ्या मारल्या हे क्रुर कार्य होतं. भारतात दंगली भडकवण्याचा कट होता. मी जनतेचा आभारी आहे, त्यांनी एकता दाखवून हा कट हाणून पाडला, असं मोदी म्हणाले.
advertisement
अशी शिक्षा दिली, दहशतवाद्यांच्या आकांची झोप उडाली
२२ एप्रिल नंतर मी एका सार्वजनिक पद्धतीने आणि जगाला समजेल असं भाष्य केलं होतं, आमचा संकल्प आहे, दहशतवाद्यांना जमिनीत गाडून टाकू. शिक्षा ही त्यांच्या आकांनाही होईल. कल्पना सुद्धा त्यांना मोठी शिक्षा मिळेल. २२ एप्रिल मी परदेशात होतो, लगेच परत आलो, आल्यानंतर लगेच बैठक बोलावली. त्याा बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिले होते, दहशतवाद्याला कडक उत्तर द्यावं लागेल. हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे. आम्हाला सैन्य दलावर पूर्ण विश्वास आहे, साहस, सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. सैन्याला पूर्ण कारवाई करण्याचा अधिकार दिला होता. सैन्य ठरवेल कधी, केव्हा कुठे आणि कशाप्रकारे कारवाई करेल, याबद्दल सांगितलं होतं. यातील काही गोष्टी मीडियामध्ये आल्या होत्या, दहशतवाद्यांना अशी शिक्षा दिली, दहशतवाद्यांच्या आकांची झोप उडाली आहे.
advertisement
'काँग्रेसचा निव्वळ बालिशपणा'
ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताला कोणीही कारवाई करण्यापासून रोखलं नाही. १९३ देशांनी पाठिंबा दिला. फक्त ३ देश पाकिस्तानच्या विरोधात उत्तर दिलं होतं. सगळे देश भारताला समर्थन देत होते. जगाचं समर्थन मिळालं पण दुर्भाग्य आहे माझ्या सैनिकांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही. २२ एप्रिल पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसचे लोक उड्या मारत होते, कुठे गेली ५६ इंच छाती, कुठे गेला मोदी, मोदी तर फेल झाला, काय मजा घेत होते. वा बाजी मारली असं त्यांना वाटत होतं. काँग्रेसला पहलगाम हल्ल्यातील मृत झालेल्या लोकांमध्ये ही आपलं राजकारण शोधत होते. माझ्यावर टीका करत होते. पण, त्यांच्या टीका, त्यांचा बालिशपणा देशाच्या सैन्याचं मनोबल कमी करत होते. काँग्रेसच्या काही नेत्यांना भारताच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, ना भारतीय सैन्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते सतत ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थितीत करत होते. तुम्ही लोक मीडियामध्ये हेडलाईन घेऊ शकता पण भारतीयांच्या मनात जागा निर्माण करू शकत नाही.
advertisement
१० मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, त्यावरून इथं संसदेत बरेच जण बोलले आहे. पण हाच तो प्रपोगंडा आहे जो सीमेपार पसरवला आहे. काही लोक हे सैन्यानं दिलेल्या तथ्यावर न बोलता पाकिस्तानने पुरवलेल्या खरं खोटं करण्यात धन्य मानत आहे. सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा जवानांनी पाकव्याप्त भागात जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केलं. एका दिवसाच्या ऑपरेशनमध्ये जवान परत आहे. बालकोट एअरस्ट्राईक केल्यावर दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष ठरलेलं होतं दहशतवाद्यांचे एपी सेंटर होते, पहलगामच्या दहशतवाद्यांना जिथून ट्रेनिंग मिळालं, तिथे आपण हल्ला केला.
Location :
Delhi,Delhi
First Published :
July 29, 2025 6:45 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pm Modi Speech: पहलगाम हल्ल्याआड दहशतवाद्यांचा होता मोठा कट, पंतप्रधान मोदींनी संसदेत पहिल्यांदाच सांगितलं