Boiled Egg Vs Omelette: अंड खाणं आरोग्यासाठी चांगलं, पण कोणतं अंड खावं? उकडलेलं की तळलेलं? जीमला जाणाऱ्या व्यक्कीसाठी महत्त्वाची माहिती
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Boiled Egg Vs Omelette: अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक त्या पोषक तत्वांची पूर्तता होऊन शरीर फिट राहायला मदत होते. त्यामुळे रोज एक अंड खाणं शरीरासाठी फायद्याचं ठरतं. मात्र कोणतं अंड खाल्ल्याने शरीराला फायदा होऊ शकतो ? उकडलेलं की तळलेलं, जाणून घेऊयात महत्त्वाची माहिती.
मुंबई : अंड्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटिन्स असतात. यासोबतच व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी 5 अशी विविध जीवनसत्त्वं आढळून येतात. काही वर्षांपूर्वी तर केंद्र सरकारने ‘संडे हो या मंड रोज खाओ अंडे’ अशी जाहिरात सुद्धा केली होती.अंड्यांमुळे व्हिटमिन्स आणि प्रोटिन्ससोबत सेलेनियम, फॉस्फरस झिंक आणि ओमेगा 3 ॲसिड आढळून येतं. अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक त्या पोषक तत्वांची पूर्तता होऊन शरीर फिट राहायला मदत होते. त्यामुळे रोज एक अंड खाणं शरीरासाठी फायद्याचं ठरतं. जर तुम्ही जीमला जात असाल, तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे तर मग अंड उकडून खाणं चांगलं आहे की, तळून त्याचं ऑम्लेट बनवून खाणं चांगलं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो.
जाणून घेऊयात अंड कशाप्रकारे खाणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे ते.

उकडलेलं अंड खाण्याचे फायदे
उकडलेले अंड्यात त्यात तेल आणि मसाले नसल्याने ते पचायला सोपं असतं. त्यात कॅलरीज कमी असतात आणि प्रथिने भरपूर असतात. उकडलेलं अंडं खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर उकडलेलं अंडं हे आरोग्यासाठी फायद्याचं आहे. उकडलेल्या अंड्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण अधिक असतं. एका अंड्यामध्ये साधारण 5.3 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन बी12, डी, ए आणि लोह आणि जस्त सारख्या खनिजे आढळून येतात. याशिवाय अंड्याच्या पिवळ्या बलकात कॅलरीज् ही आढळून येतात. त्यामुळे शरीरीला उर्जा मिळू शकते. ज्यांना वजन वाढवायचं आहे ते अंड्यातला पिवळा बलक खाऊ शकतात. मात्र तुम्ही जर जीमला जात असाल आणि तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे तर अंड्याताल पिवळा बलक खाणं टाळा. उकडलेल्या अंड्यातून पिवळा बलक वेगळा करणं सहज शक्य असतं.
advertisement
तळलेलं अडं / ऑम्लेट खाण्याचे फायदे
तुम्हाला अंड्यासोबत फायबर्स,जीवनसत्त्वं आणि खनीजे हवी असतील तर तुम्ही अंड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो किंवा तुमच्या आवडीनुसार भाज्या, मसाले टाकून त्याचा स्वाद वाढवू शकतात. त्यासोबतच शरीराला ऊर्जा देखील मिळेल.
advertisement
अडं की ऑम्लेट? काय फायद्याचं?
जर तुम्ही वजन कमी करत असाल किंवा कमी कॅलरी आहार घेत असाल तर उकडलेले अंडे सर्वोत्तम आहे. मात्र तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर बटर किंवा तूप घालून बनवलेलं ऑम्लेट खाल्ल्याने कॅलरीज आणि वजन वाढायला मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला स्नायू वाढवायचे असतील किंवा ऊर्जा मिळवायची असेल तर ऑम्लेट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 03, 2025 4:25 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Boiled Egg Vs Omelette: अंड खाणं आरोग्यासाठी चांगलं, पण कोणतं अंड खावं? उकडलेलं की तळलेलं? जीमला जाणाऱ्या व्यक्कीसाठी महत्त्वाची माहिती


