'या' 3 राशींसाठी गणेशचतुर्थी ठरणार लकी; 300 वर्षांनी जुळून आलाय योग
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
या वर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे
मुंबई, 14 सप्टेंबर: भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. या दिवशी गणरायाची स्थापना केली जाते. या वर्षी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव आहे. हा भारतात, विशेषत: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. राज्यात आतापासूनच गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे आपल्या लाडका बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक खूप उत्साहित आहेत.
या वर्षी गणेशोत्सवाचा शुभ सण काही राशीच्या व्यक्तींसाठी विशेष लकी असेल. त्या राशी आहेत मेष, मिथुन आणि मकर. ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळी गणेश चतुर्थीच्या वेळी 300 वर्षांनंतर ब्रह्मयोग आणि शुक्ल योग येणार आहे. त्यामुळे मेष, मिथुन आणि मकर राशीच्या व्यक्तींना या योगांचा फायदा होईल.
advertisement
ब्रह्म योग आणि शुक्ल योग हे हिंदू ज्योतिषशास्त्रात सांगितलेले 27 योग आहेत. हे अश्विनी नक्षत्रापासून सुरू होणार्या चंद्र आणि सूर्याच्या अंशांवरून काढले जातात. पंडित कल्की राम हे अयोध्येतले एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत आणि त्यांनी या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या 3 राशीच्या व्यक्तींना कसा फायदा होईल हे न्यूज18 ला सांगितलं आहे.
advertisement
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी गणेश चतुर्थी हा लकी कालावधी असेल. पंडित कल्की राम यांच्या म्हणण्यानुसार या राशींच्या व्यक्तींसाठी मालमत्तेत गुंतवणूक करण्याकरिता हा काळ अतिशय अनुकूल असेल. त्यांच्या व्यवसायात भरभराट होईल आणि प्रलंबित कामंही पूर्ण होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही गणेश चतुर्थी चांगली राहील. पंडित कल्की राम यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मिथुन राशींच्या व्यक्तींना अमाप संपत्ती मिळविण्यास वाव आहे. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायातही मोठी वाढ होऊ शकते आणि त्यांचं वैवाहिक जीवनदेखील चांगलं राहील.
advertisement
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होतील. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित समस्या आणि इतर प्रलंबित असाइनमेंट्सदेखील पूर्ण होतील.
गणेश चतुर्थी भाद्रपद या हिंदू महिन्यात येते, जी इंग्रजी कॅलेंडरमध्ये ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते. यंदा चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1:43 वाजता समाप्त होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2023 11:04 AM IST