advertisement

फळांवरील बुरशीमुळे शेतकरी आहेत त्रस्त, ‘हे’ उपाय करतील संकटातून सुटका!

Last Updated:

सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस बरसतोय. हे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे.

+
News18

News18

बीड, 7 ऑगस्ट : शेतकऱ्यांनी मोसंबी किंवा लिंबूवर्गीय पिकांची लागवड करून दोन ते तीन महिने उलटली आहेत. या पिकांच्या लागवडीनंतरही त्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा दरवर्षी जाणवत असतो. मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस बरसतोय. हे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. हा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याची माहिती बीडमधले कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलीय.
काय बसतो फटका?
'सध्या फायटोफ्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळ पिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. त्याचबरोबर तपकिरी कुज ब्राऊन रॉट रोग उद्भवतो हा रोग होऊ शकतो. फायटोफ्थोरा पाल्मिव्होराआणि फायटोफ्थोरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे हा रोग होऊ शकतो,' असे चांडक यांनी स्पष्ट केले.
advertisement
पावसाळ्यात जमिनीलगत फांद्यावरील पाने आणि फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो.  यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी होतात. ही पाने हातात घेऊन चुरगळण्याचा प्रयत्न केलास त्याची घडी होते. मात्र ही पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर पसरून पाणी तपकिरी आणि काळे होतात. त्यानंतर ही पानं गळून त्याचा झाडाखाली खच पडतो, असे चांडक यांनी सांगितले.
advertisement
'ही' काळजी घ्या
बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे.
झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित व्हिलेवाट लावावी. रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधांवर तसेच राहिल्यास त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढवून तीव्र वाढतो.
advertisement
फायटोफ्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळांवरील तपकिरी कुज ब्राऊन रोडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील एक.एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 डब्ल्यूपी 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी. त्यामुळे खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवर बुरशी आणि तिच्या सक्रिय विजाणूंच्या नायनाट होण्यास मदत होईल, असा सल्ला चांडक यांनी दिलाय.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
फळांवरील बुरशीमुळे शेतकरी आहेत त्रस्त, ‘हे’ उपाय करतील संकटातून सुटका!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement