Indian Post: स्पीड पोस्ट महागलं! विद्यार्थ्यांना मात्र सवलत, कसे असतील नवीन दर?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Indian Post: यापूर्वी, ऑक्टोबर 2012मध्ये स्पीड पोस्टच्या माध्यमातून पत्र पाठवण्याचा दर वाढवण्यात आला होता.
मुंबई: 1 ऑक्टोबरपासून भारतीय टपाल विभागाने आपल्या सेवेत एक महत्त्वाचा बदल केला आहे. पोस्टाने इनलँड स्पीड पोस्टच्या दरात वाढ केली आहे. जास्त किंमत आकारारून ग्राहकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नवीन दर हे वजन आणि अंतर यावरून ठरवण्यात आले आहे. विद्यार्थी आणि नव्या ग्राहकांना स्पीड पोस्टच्या दरात अनुक्रमे 10 टक्के आणि 5 टक्के सवलत दिली जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेवेत सुधारणा करण्यासाठी, वाढत्या कार्यकारी खर्चाची पूर्तता करण्यासाठी आणि नवीन गुंतवणूक करण्यासाठी स्पीड पोस्टचे दर वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी, ऑक्टोबर 2012मध्ये इनलँड स्पीड पोस्टच्या माध्यमातून पत्र पाठवण्याचा दर वाढवण्यात आला होता.
advertisement
स्पीड पोस्टाअंतर्गत मूल्यवर्धित सेवेत रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे. ही सेवा कागदपत्रं आणि पार्सल दोन्हींसाठी लागू आहे. स्पीडपोस्टाने पाठवण्याच्या प्रत्येक कागदपत्र किंवा पार्सलसाठी 5 रुपये नाममात्र शुल्क आणि लागू असलेला जीएसटी आकारला जाईल. विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्ट दरांवर 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, नवीन ग्राहकांसाठी विशेष 5 टक्के सवलत उपलब्ध आहे.
advertisement
कसे आहेत स्पीड पोस्टचे सुधारित दर
50 ग्रॅमपर्यंत वजन असलेल्या स्थानिक पार्सलसाठी 19 रुपये, 200 किमी अंतरापर्यंत 47 रुपये, 201-500 किमी अंतरापर्यंत 47 रुपये, 501-1000 किमी अंतरापर्यंत 47 रुपये, 9009-2000 किमी अंतरापर्यंत 86 रुपये. पार्सलचं वजन आणि अंतर जसंजसं वाढत जाईल तसे दरही वाढणार आहेत. जास्तीत जास्त 93 रुपये आकारले जातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Indian Post: स्पीड पोस्ट महागलं! विद्यार्थ्यांना मात्र सवलत, कसे असतील नवीन दर?