भाजी विकणारा हसन कसा झाला इस्रायलचा सगळ्यात मोठा दुश्मन? हिजबुल्लाहच्या प्रमुखाची गोष्ट

Last Updated:

Who is Hassan Nasrallah: नसरल्लाहने हिजबुल्लाहला शक्तिशाली संघटना बनवलं. त्याच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाह लष्करीदृष्ट्या शक्तिशाली झाली

हसन नसरल्लाह
हसन नसरल्लाह
Hassan Nasrallah: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबविण्याचा प्रयत्न सुरू असताना इस्रायलमध्ये आणखी एका नवीन संघर्षाला सुरुवात झाली आहे. इस्रायल आणि लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह यांच्यातला लष्करी संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल सातत्याने हिजबुल्लाहचे तळ आणि प्रमुख नेत्यांना लक्ष्य करत आहे. बैरूतमधल्या हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यात या संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. नसरल्लाहच्या मृत्यूची बातमी हिजबुल्लाहसाठी मोठा धक्का आहे. एका भाजी विक्रेत्याचा मुलगा असलेल्या नसरल्लाहचं हिजबुल्लाहला शक्तिशाली लष्करी आणि राजकीय संघटना बनवण्यात मोठं योगदान होतं.
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 1960मध्ये बैरूतमधल्या एका गरीब कुटुंबात नसरल्लाहचा जन्म झाला होता. त्याला नऊ भावंडं होती. त्याच्या वडिलांचं भाजीचं छोटं दुकान होतं. त्याला लहानपणापासूनच धार्मिक अभ्यासाची आवड होती. तो 16 वर्षांचा असताना अब्बास अल-मौसावीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. हाच अब्बास नंतर हिजबुल्लाहचा नेता झाला. इस्रायलने 1992मध्ये अब्बास मौसावीची हत्या केली. हिजबुल्लाहचं नेतृत्व 32 वर्षांच्या नसरल्लाहकडे सोपवण्यात आलं.
advertisement
नसरल्लाहने हिजबुल्लाहला आणखी शक्तिशाली संघटना बनवलं. त्याच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाह लष्करीदृष्ट्या शक्तिशाली झाली आणि लेबनीज राजकारणातही महत्त्वाची मानली जाऊ लागली. परदेशात तो मिलिशिया म्हणून काम करत राहिला. नसरल्लाहने इराणच्या मदतीने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांची सत्ता वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1997मध्ये हिजबुल्लाहचा माजी नेता शेख सुभी तुफैलीने नसरल्लाहच्या विरोधात बंड केलं होतं; पण नसरल्लाहने त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. 1997 नसरल्लाहचा मुलगा हादी इस्रायली सैनिकांशी लढताना मारला गेला. त्यावेळी हादी फक्त 18 वर्षांचा होता.
advertisement
2000 मध्ये इस्रायलविरुद्धच्या युद्धानंतर अरब जगतात नसरल्लाहला 'हिरो'चं स्थान मिळालं होतं. 34 दिवसांच्या युद्धानंतर त्याने 'दैवी विजया'ची घोषणा केली होती. 2006मध्ये इस्रायलशी झालेल्या युद्धानंतर नसरल्लाह गुप्तपणे राहत होता. तो फक्त मोठ्या पडद्यांवर स्वत:ची भाषणं प्रसारित करायचा. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या शेवटच्या भाषणात त्याने लेबनॉनमधला बॉम्बस्फोट ही इस्रायलकडून झालेली युद्धाची घोषणा असल्याचं म्हटलं होतं.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
भाजी विकणारा हसन कसा झाला इस्रायलचा सगळ्यात मोठा दुश्मन? हिजबुल्लाहच्या प्रमुखाची गोष्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement