शिक्षिकेचे शाळेतील 10 मुलांसोबत नको ते कृत्य; स्ट्रिपर पोल, सेक्स टॉईज...,अमेरिकेतील इंडियाना राज्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated:

ब्रिटनी फोर्टिनबेरी या शिक्षिकेने शाळेतील 10 मुलांसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना अमेरिकेतील इंडियाना राज्यात घडली आहे.

News18
News18
इंडियाना: अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका विवाहित शिक्षिकेने 10 मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शिक्षिकेने मुलांना ड्रग्स देऊन त्यांच्यावर अत्याचार केले आणि आपल्या घरी असलेली स्ट्रिपर पोल आणि सेक्स टॉईज त्यांना दाखवली. ब्रिटनी फॉर्टिनबेरी असे या 31 वर्षीय शिक्षिकेचे नाव असून, तिच्यावर अल्पवयीन मुलांशी लैंगिक गैरवर्तन, अल्पवयीनांना हानिकारक गोष्टी प्रसारित करणे आणि त्यांच्या गुन्हेगारीत योगदान देणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
अटक झाल्यानंतर शिक्षिका ब्रिटनी फोर्टिनबेरीने तिच्या कथित कृत्यांचे कारण तिचे 150 पौंड वजन कमी झाल्याचे सांगितले. तिचा असा दावा आहे की, वजन कमी झाल्यामुळे तिच्या वागणुकीवर कसला तरी परिणाम झाला. एका 15 वर्षीय मुलाच्या आजीने हा प्रकार पोलिसांच्या नजरेस आणला. अमेरिकेतील डब्ल्यूआरटीव्ही या वृत्तसंस्थेनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये एमिनन्स हायस्कूलमध्ये तिने किमान एका शाळकरी मुलावर अत्याचार केले. पोलिसांना भीती आहे की पीडितांची संख्या 10 पेक्षा जास्त असू शकते.
advertisement
15 व्या वर्षी अत्याचाराला बळी पडलेल्या या मुलाने तपासकर्त्यांना सांगितले की, पीडितांची संख्या 10 पेक्षा अधिक असू शकते. त्याच्या आजीने पोलिसांना सांगितले की, शिक्षिकेने त्याला अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवले आणि एका सहलीदरम्यान त्याला ड्रग्स दिले. तिने या मुलाला कोणाला काही सांगितल्यास आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती. मुलाने सांगितले की त्याच्यावर वारंवार अत्याचार झाले आणि फॉर्टिनबेरीने त्याला स्नॅपचॅटवर जोडले होते.
advertisement
या शिक्षिकेने मुलासोबत शॉवर घेतले आणि त्याला दक्षिण इंडियानातील एका गावात सहलीला नेले. हा बाल लैंगिक शोषणाचा प्रकार होता आणि तो यासाठी बोलत आहे कारण तिने आणखी मुलांचे शोषण करू नये असे त्याला वाटते. हे एखाद्या 30 वर्षीय पुरुषाने 15 वर्षीय मुलीवर केलेल्या अत्याचारापेक्षा वेगळे नाही, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
advertisement
फॉर्टिनबेरीने विद्यार्थ्यांना आपल्या स्ट्रिपर पोल आणि सेक्स टॉईजचे अश्लील स्नॅपचॅट व्हिडिओ पाठवले होते. पोलिसांनी तपासादरम्यान तिच्या घरी या वस्तू जप्त केल्या. तिने विद्यार्थ्यांना मी तुमच्यासोबत सेक्स करण्याचे स्वप्न पाहते, असे संदेश पाठवले होते. हे विचित्र आहे; तुम्ही शाळेत जाता, शिक्षकाला भेटता आणि तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असे एका पीडित मुलाने सांगितले. दरम्यान एमिनन्स कम्युनिटी स्कूल कॉर्पोरेशनने या शिक्षिकेला निलंबित केले आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
शिक्षिकेचे शाळेतील 10 मुलांसोबत नको ते कृत्य; स्ट्रिपर पोल, सेक्स टॉईज...,अमेरिकेतील इंडियाना राज्यातील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement