गगनबावडा घाट 5 दिवस बंद राहणार! प्रशासनाचा निर्णय, प्रवाशांनी वापरावे 'हे' दोन पर्यायी मार्ग
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा गगनबावडा घाट सध्या धोकादायक बनला आहे. शनिवारी, 4 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता...
Kolhapur News : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा गगनबावडा घाट सध्या धोकादायक बनला आहे. शनिवारी, 4 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने या घाटातून होणारी सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाट रस्त्याचे काम करेपर्यंत हा घाट मार्ग बंद करण्याचा निर्यण प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा घाट रस्ता 12 सप्टेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरड कोसळ्यामुळे रस्ता बंद
सकाळी दरड कोसळल्यानंतर घाटात अनेक वाहने अडकली. प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू करून वाहने पर्यायी मार्गांवर वळवली. दरड हटवण्याचे काम लगेच सुरू करण्यात आले असले, तरी अंधारामुळे ते थांबवावे लागले होते. मात्र, हे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आहे.
गगनबावडा घाट हा दोन्ही जिल्ह्यांमधील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या घाटातून दररोज शेकडो प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांतील माती सैल झाली असून, दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक धोका पत्करू नये असे आवाहन केले आहे.
advertisement
प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग
जोपर्यंत दरड हटवण्याचे काम पूर्ण होत नाही आणि घाट मार्ग पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. यामध्ये खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्ग क्र. 171 (भुईबावडा घाट मार्गे) आणि देवगड-निपाणी राज्य महामार्ग क्र. 178 (फोंडा घाट मार्गे) या पर्यायी मार्गांचा वापर करू शकता.
advertisement
हे ही वाचा : वन्यजीवांना खायला घालताय? सावधान! खावी लागेल जेलची हवा; इतकंच नाहीतर 'इतक्या' लाखांचा होईल दंड
हे ही वाचा : डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन नाचतो 'हा' मामा! VIRAL VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, "देवाचा चमत्कार"
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 07, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
गगनबावडा घाट 5 दिवस बंद राहणार! प्रशासनाचा निर्णय, प्रवाशांनी वापरावे 'हे' दोन पर्यायी मार्ग