advertisement

Wedding Invitation : आग्रहाचे निमंत्रण! मतदानासाठी लग्न? हटके पत्रिकेनं वेधलं मतदारांचं लक्ष

Last Updated:

Wedding Invitation : आग्रहाचे निमंत्रण! लग्नाची ही पत्रिका वाचून तुम्ही म्हणाल लय भारी!

News18
News18
मुंबई : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलपासून देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान सुरू झालं आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे तर तिसरा टप्पा येत्या 7 मे रोजी होणार आहे. त्यामुळे देशभरात निवडणुकीचं वारं वाहत आहे. नागरिकांनी मतदान करावं म्हणून त्यांना विविध मार्गांनी प्रोत्साहन दिलं जात आहे. नुकतंच मतदानाशी संबंधित एक अनोखी लग्नपत्रिका इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका पुणे शहरातून व्हायरल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी व्हायरल झालेली ही लग्नपत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही पत्रिका लग्नाचं आमंत्रण नसून मतदान करण्यासाठी दिलं गेलं आमंत्रण आहे.
ही लग्नपत्रिका मराठीत आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, संविधानाकडून मिळालेल्या अधिकारांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून आपल्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी आणि आपला आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे. या निमंत्रणानुसार लोकशाहीच्या महामुहूर्तावर मतदार आणि लोकशाहीचा विवाह होणार आहे. लग्नाचं ठिकाण तुमच्या जवळील मतदान केंद्र असल्याचं नमूद केलेलं आहे. आपले विनीत म्हणून 'आम्ही भारताचे लोक' असा उल्लेख आहे.
advertisement
हे आमंत्रण व्हायरल होताच अनेक युजर्सनी प्रत्येक मताचं मूल्य सांगितलं आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं की, ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांमध्ये मतदान न केल्यास दंडही आकारला जातो. जर तुम्हाला कोणताही नेता निवडायचा नसेल तर तुम्ही 'नोटा'ला मतदान करू शकता. पण, मतदान करणं महत्त्वाचं आहे. एका युजरने लिहिलं की, ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. ती कार्डवर प्रिंट करण्याची गरज नाही. एका युजरने या निमंत्रण पत्रिकेवर टीकाही केली आहे. तो म्हणाला की, या कथानकात ट्विस्ट आहे. लोकशाही नवरदेवाची अगोदरच फसवणूक करत आहे.
advertisement
संविधानातील तरतुदीनुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेली आणि भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती मतदान करण्यास पात्र आहे. संबंधित व्यक्तीने मतदार यादीमध्ये आपली नाव नोंदणी केली तर ती आपल्या इच्छेनुसार कोणत्याही उमेदवाराला मतदान करू शकते. मात्र, काही मतदार मतदान करण्याबाबत उदासीनता दाखवतात. ते आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Wedding Invitation : आग्रहाचे निमंत्रण! मतदानासाठी लग्न? हटके पत्रिकेनं वेधलं मतदारांचं लक्ष
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement