Maharashtra politics : बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले? अनिल परबांनी तोडल्या कदमांच्या आरोपांच्या तारा, म्हणाले '14 वर्षानंतर...'

Last Updated:

Anil Parab On Ramdas Kadam Allegation : कुठलीही बॉडी दोन दिवस शवपेढीशिवाय ठेवता येते का? रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात आहे, अशी टीका देखील अनिल परब यांनी केली आहे.

Anil Parab On Ramdas Kadam Allegation
Anil Parab On Ramdas Kadam Allegation
Maharashtra politics Anil Parab : शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर आता आमदार अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. रामदास कदम यांनी काल दसऱ्या मेळाव्यात नीचपणा केला आहे. त्याला नीच हाच शब्द लागू होतो. याचं उत्तर आम्हाला देण्याची गरज न्हवती. पोरी नाचवून... भडगिरी करणाऱ्यांना लायकी नाही. माझ्यावर तेव्हा जबाबदारी होती. बाळासाहेब यांच्या अंतिमक्षणी मी होतो आणि त्याचा मी साक्षीदार आहे. रामदास कदम यांना 14 वर्षांनी कंठ का फुटला? असा सवाल अनिल परब यांनी विचारला आहे.

बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले का?

रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा. 1993 साली ज्योती रामदास कदम जाळून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना जाळण्यात आलं? याची देखील नार्को टेस्ट करा, अशी आमची मागणी आहे, असं अनिल परब म्हणाले. बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले का? असा आरोप केला जातोय, पण हे 100 टक्के खोटं आहे. बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलीही बॉडी दोन दिवस शवपेढीशिवाय ठेवता येते का? रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात आहे, अशी टीका देखील अनिल परब यांनी केली आहे.
advertisement

सहारा स्टेडियममध्ये बाळासाहेबांचे मोल्ड 

डॉक्टर चुकीचं करतील का? रामदास कदम यांचे आरोप खोटे आहेत. बाळासाहेब यांनी स्वत:चे मोल्ड बनवले होते. अंधेरीच्या सहारा स्टेडियममध्ये त्यांनी मोल्ड ठेवले होते. रामदास कदमचं शिक्षण कमी होते. बाळासाहेब गेल्यानंतर असे कोणते ठसे घेतले? त्याचा काय फायदा होतो? असा सवाल अनिल परब यांनी विचारला. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडं आहे. त्यांची संपत्ती काय होती, मला माहिती आहे, असं अनिल परब म्हणाले.
advertisement
दरम्यान, रामदास कदम हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे. हे भिकेचा कठोरा घेवून फिरत होते. माझी आई वारली तेव्हा मी यांच्या निवडणुकीची सुत्रे हाती घेतली होती. इतके दसरे झाले पण आता विषय का…पालिका निवडणूक आहे. इतर विषयांपासून लोकांचे लक्ष वेधायचंय. मृत्यूपत्राला जयदेव ठाकरेंनी आव्हान दिले होते. चार पाच वर्षे कोर्टात केस चालवली पण काही झाले नाही. ज्यांना शंका आहे त्यांनी कोर्टात जावं, असंही अनिल परब म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Maharashtra politics : बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले? अनिल परबांनी तोडल्या कदमांच्या आरोपांच्या तारा, म्हणाले '14 वर्षानंतर...'
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement