Pahalgam Attack: पहलागाम हल्ला प्रकरणी मोठी माहिती समोर, NIA ने केला महत्त्वाचा खुलासा, दहशतवाद्यांना कुणी दिला आसरा?

Last Updated:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) धक्कादायक बाबी उघड केल्या आहे.

News18
News18
दिल्ली: संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या पहलगाम हल्ला प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात फक्त ३ दहशतवादी सहभागी असल्याचं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे. ज्यांनी या दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा दिली होती, त्या लोकांना फक्त ३००० रुपये देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जम्मू-काश्मिरमध्ये २ स्थानिकांना अटक करण्यात आली आहे. डिजिटल पुराव्यांमुळे हे सत्य समोर आलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) धक्कादायक बाबी उघड केल्या आहे. तपासानुसार, हा हल्ला करण्यात फक्त तीन दहशतवाद्यांचा थेट सहभागी होता. या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरही मदत मिळाली. यासाठी त्यांना फक्त ३००० रुपये देण्यात आले होते.  हल्ल्याचा उद्देश जास्तीत जास्त दहशत पसरवणं आणि सुरक्षा दलांच्या प्रतिसादात होणाऱ्या विलंबाचा फायदा घेणे हा होता.
advertisement
पहलगामला लक्ष्य करण्यामागील कारण म्हणजे, हा परिसर शहरापासून दूर आहे, पर्यटकांनी भरलेला आहे आणि एकांत आहे. दरम्यान, तपास संस्था आता दहशतवादी हाशिम मुसा यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाशिम सध्या खोऱ्यातील एका सक्रिय दहशतवादी टोळीचा म्होरक्या आहे. या हल्ल्याच्या कटात आणि नियोजनात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असावीस असा एनआयएला संशय आहे.
advertisement
डिजिटल पुराव्यांमुळे प्रकरण उघड
एनआयएने दहशतवाद्यांकडून अनेक डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. याशिवाय, घटनास्थळावरून सापडलेले रिकामे काडतुसं देखील त्याच शस्त्रांशी जुळतात. हे दहशतवाद्यांनी वापरले होते. या तांत्रिक पुराव्यांवरून हा हल्ला अतिशय सुनियोजित पद्धतीने करण्यात आल्याचं सिद्ध होतं.
मदत करणाऱ्या स्थानिकांना अटक
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन स्थानिक लोकांना या कामाच्या बदल्यात फक्त ३००० रुपये मिळाले असल्याचे तपासात उघड झालं आहे. दोन्ही आरोपींना एनआयएने अटक केली आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. स्थानिक मदतीशिवाय दहशतवादी इतका मोठा हल्ला करू शकले नसते, असं एजन्सीचं मत आहे.
advertisement
पहलगाम लक्ष्य का?
पहलगाम हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे शहरापासून दूर आहे. यामुळेच दहशतवाद्यांना ते लक्ष्य करायचे होते जेणेकरून जास्तीत जास्त लोक प्रभावित होतील आणि सुरक्षा दलांना घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागेल. ही रणनीती कामी आली आणि हल्ल्यादरम्यान परिसरात दहशत पसरली.  सध्या, एनआयए हाशिम मुसाच्या भूमिकेच्या आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कट उघड करण्यात गुंतले आहे. या प्रकरणात आणखी अटक होऊ शकते, असे तपास यंत्रणेचं म्हणणं आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pahalgam Attack: पहलागाम हल्ला प्रकरणी मोठी माहिती समोर, NIA ने केला महत्त्वाचा खुलासा, दहशतवाद्यांना कुणी दिला आसरा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement