advertisement

Parliament Security Breach: लोकसभेत स्मोक कँडल फुटत होत्या, तेव्हा काय करत होते राहुल गांधी? Photo आला समोर

Last Updated:

भारताच्या नव्या संसदेमध्ये बुधवारी सुरक्षेमध्ये मोठी चूक घडली. संसद भवनामध्ये हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना दोन जणांनी लोकसभेमध्ये घुसखोरी कली.

लोकसभेत स्मोक कँडल फुटत होत्या, तेव्हा काय करत होते राहुल गांधी?
लोकसभेत स्मोक कँडल फुटत होत्या, तेव्हा काय करत होते राहुल गांधी?
नवी दिल्ली, 13 डिसेंबर : भारताच्या नव्या संसदेमध्ये बुधवारी सुरक्षेमध्ये मोठी चूक घडली. संसद भवनामध्ये हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना दोन जणांनी लोकसभेमध्ये घुसखोरी कली. दोन्ही आरोपींनी संसदेत पिवळ्या रंगाच्या स्मोक कॅन्डल फोडल्या, त्यामुळे संसदेत एकच गोंधळ उडाला. सगळे सुरक्षारक्षक आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत होते. हा हल्ला झाला तेव्हा राहुल गांधींही संसदेत उपस्थित होते. राहुल गांधी त्यांच्या जागेवर उभेही राहिले आणि संपूर्ण घटनाक्रम बघत होते. लोकसभेत गोंधळ सुरू होता तेव्हा राहुल गांधी त्यांच्या जागेवरून एक इंचही हलले नाहीत.
संसदेमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली आहे. या चौघांचीही सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. आजच्याच दिवशी 2001 साली संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याच दिवशी 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा संसदेमध्ये ही घटना घडली आहे. दोन व्यक्ती बुटांमध्ये स्मोक कॅन्डल लपवून संसदेत शिरले. यानंतर संसदेचं कामकाज सुरू असताना अचानक एका युवकाने गॅलरीमधून खाली उडी मारली. उडी मारताच या युवकाने स्मोक कॅन्डलचा स्प्रे उडवायला सुरूवात केली, यामुळे संसदेत अचानक पिवळा धूर यायला सुरूवात झाली, यामुळे संसदेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. संसदेत पकडलेल्यांपैकी एकजण महाराष्ट्रातील लातूरचा असून त्याचं नाव अमोल शिंदे आहे.
advertisement
संसदेत उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं, तसंच संसदेबाहेर असलेल्या दोन आरोपींनाही पकडण्यात आलं.
22 वर्षानंतर हल्ला
याआधी आजच्याच दिवशी 2001 साली अफजल गुरूने संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा हल्ला होता. या हल्ल्याच्या 22 वर्षांनी पुन्हा एकदा संसदेमध्ये असा प्रकार घडला आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला 3 महिने झाले आहेत, त्यानंतर संसदेच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक समोर आली आहे.
advertisement
या हल्ल्याच्या आधी एका महिलेने संसदेबाहेर गोंधळ घातला होता. महिलेचं नाव नीलम पुत्री कौर सिंग आहे. नीलम हिसारच्या रेड स्क्वेअर भागात राहणारी असून तिचं वय 42 वर्ष आहे. ही महिला सिव्हील सर्व्हिसची तयारी करत होती.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Parliament Security Breach: लोकसभेत स्मोक कँडल फुटत होत्या, तेव्हा काय करत होते राहुल गांधी? Photo आला समोर
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement