हातात हात घालत दोन्ही तरुणी पोलीस ठाण्यात, म्हणाल्या, 'आम्हाला एकमेकींसोबत निकाह करायचाय', नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
काही दिवसांपूर्वी हरिद्वारच्या ज्वालापूर येथील एक मुलगी आपल्या कुटुंबीयांसह पिरान करियर दरगाह येथे आली होती. इथे तिची भेट सहारनपूर येथील मुलीसोबत झाली. दोघांनी एकमेकींचे नंबर घेतले.
ओम प्रयास, प्रतिनिधी
हरिद्वार : कुटुंबीयांच्या विरोधात जात अनेक तरुण-तरुणींनी एकमेकांनी लग्न केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, त्यातच आता आणखी एक अनोखी घटना समोर आली आहे. दोन तरुणींनी एकमेकींशी निकाह करण्याचा निर्णय घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. आम्ही एकमेकींशिवाय राहू शकत नाही. आम्हाला आयुष्यभर सोबत राहायचे आहे. त्यामुळे आमचा निकाह करून द्यावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.
advertisement
ही घटना हरिद्वार येथील आहे. दोन्ही तरुणींना यावेळी समजावण्यात आले. मात्र, त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. तसेच आमचे एकमेकींशी लग्न लावून देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अनेक तास हा गोंधळ याठिकाणी पाहायला मिळाला. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून या दोन्ही तरुणींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनाही तरुणींच्या या मागणीनंतर आश्चर्य झाले. हरिद्वारच्या ज्वालापुर येथील या घटनेची सर्वत्र एकच चर्चा होत आहे.
advertisement
कसं जुळलं सूत -
काही दिवसांपूर्वी हरिद्वारच्या ज्वालापूर येथील एक मुलगी आपल्या कुटुंबीयांसह पिरान करियर दरगाह येथे आली होती. इथे तिची भेट सहारनपूर येथील मुलीसोबत झाली. दोघांनी एकमेकींचे नंबर घेतले. यानंतर त्या फोनवर नियमितपणे बोलू लागल्या. तसेच व्हॉट्सअपवरही चॅट करू लागल्या. यानंतर त्या दोघींच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघींनी एकमेकींसोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
advertisement
वाह! एकाच कुटुंबातील दोन बहिणींची कमाल, दोन्ही झाली नायब तहसिलदार तर दुसरी...
view commentsयानंतर सहारनपूर येथील मुलगी ज्वालापूर येथे आली. दोन्ही तरुणी स्थानिक पोलिस ठाण्यात आल्या आणि आम्हाला एकमेकींसोबत राहायचे आहे, आमच्या दोघींचा एकमेकींसोबत निकाह करुन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांना समजावले मात्र त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. यामुळे त्यांच्या कुटुबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले. यानंतर त्या दोघींना त्याच्या कुटंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती ज्वालापूर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज निरीक्षक रमेश तनवार यांनी दिली.
Location :
Uttarakhand
First Published :
June 09, 2024 11:20 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
हातात हात घालत दोन्ही तरुणी पोलीस ठाण्यात, म्हणाल्या, 'आम्हाला एकमेकींसोबत निकाह करायचाय', नेमकं काय घडलं?


