Vande Bharat: नगरकरांची भारी सोय! पुणे व नागपूरला जाण्यासाठी मिळाली वंदे भारत

Last Updated:

Vande Bharat: अहिल्यानगर शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार जास्त आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे अशा प्रवाशांची सोय होणार आहे.

Vande Bharat: नगरकरांची भारी सोय! पुणे व नागपूरला जाण्यासाठी मिळाली वंदे भारत
Vande Bharat: नगरकरांची भारी सोय! पुणे व नागपूरला जाण्यासाठी मिळाली वंदे भारत
अहिल्यानगर: महाराष्ट्र राज्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून अहिल्यानगर (अहमदनगर) हे शहर प्रसिद्ध आहे. या शहराची राज्यातील अनेक शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आता ही कनेक्टिव्हिटी आणखी सुधारणार आहे. कारण, नगर शहरातून आता दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते पुणे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं आज लोकार्पण केलं. या गाडीसाठी अहिल्यानगर शहरात थांबा असल्याने नगरकरांची फार मोठी सोय होणार आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे अहिल्यानगर जिल्हा पुणे व नागपूर या महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडला जाणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी आठवड्यातील सहा दिवस (सोमवार वगळता) नागपूरहून पुण्याकडे धावेल तर मंगळवार वगळून इतर सहा दिवस पुण्याहून नागपूरकडे धावेल.
advertisement
नागपूरमधील अजनी स्थानकातून ही गाडी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी पुण्याच्या दिशेने निघेल आणि संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर येईल. या ठिकाणी वंदे भारतचा दोन मिनिटांचा थांबा आहे. त्यामुळे 7 वाजून 37 मिनिटांनी ही गाडी पुण्याकडे मार्गस्थ होईल.
याउलट, पुण्याकडून नागपूरकडे निघणारी वंदे भारत सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी अहिल्यानगरला पोहचेल. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत ही नागपूरकडे निघेल. नगरच्या प्रवाशांना अवघ्या दोन मिनिटांत गाडी पकडावी लागणार आहे. या गाडीमुळे नगर ते पुणे हा प्रवास सुमारे 2 तासांत करता येणार आहे. अहिल्यानगर शहरातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार जास्त आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेसमुळे अशा प्रवाशांची सोय होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Vande Bharat: नगरकरांची भारी सोय! पुणे व नागपूरला जाण्यासाठी मिळाली वंदे भारत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement