Farmer Success: जिथं कुसळं उगवत होती, तिथं पिकवला पैसा, छ. संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं शोधला यशाचा फॉर्म्युला

Last Updated:
Pomegranate Farming: छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याने कोरडवाहू शेतीत डाळिंबाची बाग लावली आहे. यातून दरवर्षी 3 लाखांवर उत्पन्न निघत आहे.
1/5
सध्याच्या काळात मराठवाड्यातील काही शेतकरी आपल्या शेतात वेगळे प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीसोबतच फळशेतीकडे देखील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा येथील शेतकरी श्रीपत दंदाळे हे 8 ते 9 वर्षांपासून डाळिंब फळबाग शेती करत आहेत.

advertisement
2/5
श्रीपत दंदाळे यांनी आपल्या कोरडवाहू शेतात 3500 डाळिंब झाडांची लागवड केलेली आहे. या माध्यमातून त्यांना गतवर्षी 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा पाऊस चांगला असल्याने आंब्या बहारात सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न निघाले असून मृग बहारात 2 लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा दंदाळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.

3/5
दंदाळे यांनी जालना रोडवर सटाणा येथे 9 ते 10 एकरमध्ये एकूण 3500 हजार डाळिंब झाडांची लागवड केली आहे. डाळिंब लागवडीचे क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे काही प्रमाणात प्राण्यांनी देखील डाळिंबाचे नुकसान केले. त्यात काही झाडे रोगामुळे खराब झाली आहेत.

4/5
यंदा पाऊस समाधानकारक झाला असून डाळिंबाला दरही चांगला मिळाला आहे. डाळिंबाला 1200 ते 1300 रुपये प्रति कॅरेट प्रमाणे भाव मिळाला आहे. पाण्याची सुविधा नसतानाही दुष्काळी भागात डाळिंब शेतीचा यशस्वी प्रयोग केल्याने अनेक शेतकरी ही डाळिंब शेती पाहण्यासाठी येतात.

5/5
डाळिंब शेतीमध्ये खत आणि औषधांचा मोठ्या प्रमाणात खर्च असतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांच्या फवारण्या यावर कराव्या लागतात तसेच याची वेळोवेळी काळजी घेणे देखील चांगल्या उत्पन्नासाठी तितकेच महत्त्वाचे ठरते. जो शेतकरी डाळिंब शेतीत मेहनतीने आणि टिकून काम करेल, त्यांना डाळिंब शेती फायद्याची ठरते, असे दंदाळे सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement