Black Turmeric: पिवळी नव्हे काळी हळद! सांगलीचा शेतकरी झाला मालामाल!

Last Updated:
Black Turmeric: पिवळ्या हळदीची शेती अनेकांना माहिती असेल. सांगलीतील शेतकरी चक्क काळ्या हळदीच्या शेतीतून मालामाल झाला आहे.
1/7
जीआय मानांकन असणारी सांगलीची हळद जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी हळदीची शेती करतात. पण अर्धापूर येथील शेतकरी प्रकाश घोडेकर यांनी मात्र आपल्या शेतात वेगळाच प्रयोग केला आहे. त्यांनी चक्क काळ्या हळदीची लागवड केलीये. यातून त्यांना लाखोंचा नफा झाला आहे.

advertisement
2/7
शेतकरी प्रकाश विश्वनाथ घोडेकर यांची अर्धापूर शिवारातील 461 गटात शेती आहे. ते आपल्या शेतात नेहमी केळी, सोयाबीन, गहू, पिवळी हळद आदी पिकांची लागवड करतात. गेल्या काही वर्षांत मात्र त्यांनी आपल्या शेतात वेगळाच प्रयोग केला.

3/7
घोडेकर यांना काळ्या हळदी संदर्भात माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी 700 रुपयात 200 ग्रॅम काळ्या हाळदीचे बेणे खरेदी केले. सतत तीन वर्षे त्याची लागवड करत त्याचे अधिकाधिक बेणे साठविले.

4/7
मागील वर्षी त्यांनी एक क्विंटल बेण्याची लागवड केली. त्यास शेणखत, गांडूळखत, लिंबोळी अर्क, गोमूत्र फवारणी करत पिकाची जोपासना केली. आता एकूण तीन क्विंटल काळ्या हाळदीचे उत्पादन निघाले आहे. योग्य बाजारभाव मिळाल्याने त्यांना भरघोस आर्थिक नफा मिळाला.

5/7
आयुर्वेदात औषधीसाठी काळ्या हळदीला महत्त्व आहे. तर रक्तदाब, मधुमेह व कर्करोगावर गुणकारी काळ्या हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधी व इतर औषधीसाठी केला जातो.

6/7
परिसरातील डॉक्टर, शेतकरी हजार रुपये प्रति किलो दराने काळ्या हळदीची खरेदी करत आहेत. याविषयी माहिती मिळाल्याने अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन याविषयी माहिती घेत आहेत.

7/7
काळ्या हळदीला चांगली बाजारपेठ कुठे आहे, चांगला भाव कुठे मिळतो व याचे बेणे कुठे मिळते. यासंदर्भात तेवढी माहिती उपलब्ध नाही. कृषी विभागाने या विषयी जनजागृती करावी, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा औषधी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज प्रयोगशील शेतकरी प्रकाश घोडेकर यांनी व्यक्त केली. (प्रीती निकम, प्रतिनिधी)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement