Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याची शेतीच भारी, फळबाग शेतीतून साधली प्रगती, वर्षाला 27 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अवघ्या 23 वर्षाचा असताना या तरुणाने संपूर्ण शेतीचा भार स्वतःवर घेऊन त्यात नवनवीन प्रयोग करायला सुरवात केली आहे. त्यातून आता वर्षाला 27 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक हे गाव केळी पिकांसाठी अग्रेसर आहे. केळी पिकांच्या माध्यमातून तेथील अनेक शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्याच गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी यश संतोष नराजे. अवघ्या 23 वर्षांचा असताना या तरुणाने संपूर्ण शेतीचा भार स्वतःवर घेऊन त्यात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. त्याच्याकडे 22 एकर वडिलोपार्जित शेती आहे.
advertisement
यशने पशुविज्ञान विषयात पदवी घेतली आहे. आताही त्याचे शिक्षण सुरूच आहे. त्याचे वडील संतोषराव नराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तो संपूर्ण शेती स्वतः सांभाळतो आहे. यश गेल्या सहा वर्षांपासून शेती क्षेत्रात काम करतो आहे. त्याच्या शेतात केळी आणि पपई हे मुख्य पिके तो घेतो. त्याचबरोबर आंतरपीक म्हणून कलिंगड, खरबूजची देखील लागवड तो करतो. कपाशी, सोयाबीन, तूर, कांदा अशीही पिके तो शेतात घेत आहे. हिंगणी बुद्रुक हे गाव केळी पिकांसाठी अग्रेसर आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने प्रत्येक शेतकरी केळीचे पीक घेतो. केळी पिकांत नवनवीन प्रयोग प्रगतशील तरुण शेतकरी यश यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला.
advertisement
तेव्हा तो सांगतो की, सुरुवातीला शेतात आम्ही पारंपरिक पिके घेत होतो. पण, त्यातून काही जास्त उत्पादन आणि नफा मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही केळी, पपई, खरबूज, कलिंगड यासारखी पिके घेण्यास सुरुवात केली. केळीची लागवड मी वेगळा फॉर्म्युला वापरून केलेली आहे. मी शेतात केळीची लागवड करताना 70 बाय 30 हा फॉर्म्युला वापरला आहे. म्हणजेच 70 टक्के जागा ही पिकाला दिली जाते, त्यामुळे पिकाचा विकास होतो. उर्वरित 30 टक्के जागा ही शेतात काम करण्यासाठी राहते. ही पद्धत वापरल्याने काम करण्यास सोपे जाते आणि उत्पादनातही वाढ होते, असे यश सांगतो.
advertisement
पिकांवर त्या मातीचा थर जमा होतो आणि फुलकिडींना त्यात डंख मारणे अशक्य होते, यामुळे नुकसान होण्यापासून टाळता येते. त्याचबरोबर उन्हाळ्यात केळी पिकाच्या संरक्षणासाठी क्रॉप कव्हरऐवजी बोरू किंवा धैचासारख्या पिकांची लागवड बागेच्या सभोवताली आम्ही करतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण होते. तसेच आंतरपीक म्हणून केळी लागवडीच्या 15 दिवस आधी कलिंगड लागवड सुद्धा मी करतो. कलिंगडाचे उत्पादन एकरी 25 ते 30 टन असे मिळते. तर केळीचे उत्पादन सुद्धा त्याच प्रमाणात म्हणजे 25 ते 30 टन या प्रमाणात मिळते.
advertisement
पपई पिकात सुद्धा चांगले उत्पादन केळी पिकाबरोबरच आम्ही पपई पिकाला सुद्धा तितकेच प्राधान्य देतो. पपईची लागवड सुद्धा मी पाच फुटी गादी वाफ्यावर करतो. त्यात आंतरपीक म्हणून खरबूजची लागवड करतो. पपईचे उत्पादन एकरी 50 तर 60 टनांपर्यंत होते. तर खरबूज एकरी 12 टनांपर्यंत होते. या शेतीच्या आधारावर आमचा आर्थिक विकास झाला.
advertisement
advertisement
शेतीबरोबरच पोल्ट्री फार्म पाच वर्षांपूर्वी मी करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यासाठी 15 लाखांची गुंतवणूक सुद्धा मी शेतीच्या आधारावर केली. या पक्ष्यांची 65 दिवसांची बॅच असते. कंपनी लहान पिल्ले पुरवते आणि पक्षी अडीच किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचे झाल्यानंतर विकत घेते. त्याला दर प्रती किलो 80 ते 120 रुपये असा मिळतो. काही वेळा त्या दरात घसरण सुद्धा होते. या व्यवसायाने सुद्धा चांगला आधार दिला आहे. उन्हाळ्यात अकोला जिल्ह्यात तापमान खूप जास्त असते. त्यामुळे पक्ष्यांसाठी कुलर आणि फॉगर लावलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना गारवा मिळावा यासाठी शेडच्या बाजूला वृक्षलागवड सुद्धा केलेली आहे, असे यश सांगतो.