Turmeric Polishing: सांगलीची GI मानांकित हळद बनते कशी? पॉलिश अन् प्रतवारीची प्रक्रिया
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Turmeric Polishing: जीआय मानांकित सांगलीची हळद संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या हळदीची पॉलिश अन् प्रतवारीची प्रक्रिया जाणून घेऊ.
जीआय मानांकन मिळालेल्या सांगलीच्या हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठी मागणी आहे. हळद पिकातून जिल्ह्यामध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. हळदीची काढणी केल्यानंतर विक्रीपूर्वी हळदीवर काही प्रक्रिया केल्या जातात. याबाबत हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील कृषी सहाय्यक प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात. त्यानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हळद पॉलिश केल्यानंतर हळकुंडाची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करावी. जाड, लांब हळकुंडे (3 ते 5 सें.मी. लांबी), मध्यम जाड हळकुंडे (2 ते 3 सें.मी. लांबी), लहान आकाराची हळकुंडे (2 सें.मी. पेक्षा कमी लांबी) लहान माती आणि खडेविरहित कणी.
advertisement
advertisement