फक्त काही तास बाकी! 23 नोव्हेंबरला लक्ष्मी नारायण योग, या 3 राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार

Last Updated:
Lakshmi Narayan Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्थान आणि संक्रमण जीवनावर मोठा प्रभाव टाकते असं मानले जातं. त्यातही शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचे महत्त्व विशेष मानले जातं.
1/5
Astrology news
वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे स्थान आणि संक्रमण जीवनावर मोठा प्रभाव टाकते असं मानले जातं. त्यातही शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचे महत्त्व विशेष मानले जातं. शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, आनंद, ऐहिक सुख आणि ऐशोआरामाचा प्रतीक मानला जातो. तर बुध ग्रह बुद्धिमत्ता, बोलचाल, तर्कसंगत निर्णयक्षमता, व्यापार-वाणिज्य आणि आर्थिक व्यवहारांचा कारक आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या संक्रमणाकडे ज्योतिषशास्त्रात विशेष लक्ष दिले जाते, कारण त्यांचा प्रभाव विस्तृत आणि प्रभावी असतो.
advertisement
2/5
astrology
सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत स्थित आहे. पंचांगानुसार, 23 नोव्हेंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. याच ठिकाणी शुक्र ग्रहही संक्रमण करणार असल्याने या दोन ग्रहांची एकत्र युती तयार होणार आहे. बुध आणि शुक्र ग्रह एकत्र येताच निर्माण होणाऱ्या सकारात्मक आणि शुभ योगास लक्ष्मी–नारायण योग म्हणतात. ज्योतिषांच्या मते, हा योग धन, प्रगती, कीर्ती आणि समृद्धी घेऊन येणारा योग मानला जातो. विशेषतः 23 नोव्हेंबर रोजी निर्माण होणारा हा लक्ष्मी–नारायण योग काही विशिष्ट राशींना अधिक लाभ देऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींसाठी हा दिवस भाग्याचा द्वार उघडणारा ठरणार आहे.
advertisement
3/5
तूळ रास
तूळ रास -  तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे लक्ष्मी–नारायण योगाचा सर्वात मोठा लाभ या राशीला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कर्माला योग्य न्याय मिळेल आणि अडकलेली कामे पुढे सरकतील. नोकरी किंवा व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंददायी घटना घडू शकतात. प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजातील मान-सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. मात्र या काळात सुख-सुविधांवरचा खर्चही वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन योग्य असणे आवश्यक आहे.
advertisement
4/5
कन्या रास
कन्या रास -  कन्या राशीसाठी हा योग अत्यंत फलदायी मानला जात आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची नवीन दारे खुली होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असेल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि मुलांच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता मजबूत होईल.
advertisement
5/5
वृषभ रास
वृषभ रास -  वृषभ राशीसाठी लक्ष्मी–नारायण योग लाभ आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक, व्यवसाय किंवा पगार वाढीबाबत शुभ संकेत दिसतील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो आणि तो प्रवास तुमच्या फायद्याचा ठरेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल, तर प्रेमसंबंध असणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मित्रांचा आणि जवळच्या लोकांचा आधार तुमचे मनोबल वाढवेल.
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement