Aajache Rashibhavishy: कुणाला धनलाभ तर कुणाला संकटं गाठणार, 1 ऑगस्टला नशीब पालटणार, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आज 1 ऑगस्ट रोजी तुमच्या नशिबात काय लिहिलेय? आज तुम्ही कुठल्या गोष्टी टाळाव्या किवा कराव्यात? हे जाणून घेण्यासाठी आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी -परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. ज्या लोकांनी नातेवाईक किंवा मित्र परिवाराकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी -तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आपल्या पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा आणि चिंतेचा विषय असेल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो यामागचे सत्य तुम्हाला आज कळेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. आपल्या मनात आज आपल्या कुणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील.आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
सिंह राशी - आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल. आजच्या दिवशी हाती घेतलेले कामे मार्गी लागतील. आज तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा आहे.
advertisement
कन्या राशी - तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. दिवसाची सुरुवात आज तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आज आपल्या मनाला काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तुळ राशी - आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. आपल्या मुलांबद्दल आज तुम्हाला समाधान वाटेल. तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल.आज हाती घेतलेले कामे पूर्ण होतील. अशा सोडू नये याने तुम्हाला लाभ मिळेल आज. अविवाहित मंडळी आज आनंदाची बातमी घरी देतील. तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.
advertisement
धनु राशी - आज तुमच्या हाताने धर्मिक कामे होण्याचा योग आहे. कुठलाही निर्णय घेणे आज तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीत राज योग असणार आहे. हव्या त्या गोष्टी तुम्हाला मिळतील याची अपेक्षा आहे. आजचा दिवस आई-वडिलांच्या सेवेत घालवा याने नक्कीच लाभ होईल. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा आहे.
advertisement
मकर राशी - ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा.कोणालाही पैसे आज उधार देऊ नका यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. आज तुमचे बोलणे हे इतरांना कडवट वाटू शकते. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकतात आणि तुम्हाला समजू शकते की, चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर, आज पासूनच धन बचत करा. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
मीन राशी -जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषत: आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी यश प्राप्ती करू शकतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा आहे.
advertisement