नेपाळ एकमेव देश नाही जिथे सोशल मीडियावर बंदी, 'या' देशामध्ये लोक अनेक वर्षांपासून वापरत नाहीत इंटरनेट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या निर्णयानंतर देशात मोठ्या प्रमाणात आंदोलनं उसळली आहेत. तरुणांनी या बंदीविरोधात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये भांडणं झाली, ज्यात काहींचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तरुणाईचं प्रमुख आणि अवडतं प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांसारख्या अॅप्सवरून माहिती शेअर करणं, संवाद साधणं आणि व्यवसाय वाढवणं, तसेच मित्रांशी गप्पा मारणे, ते आपल्या आयुष्यात काय करतायत हे पाहाणं आता सर्वसामान्य झालं आहे. पण जगातील काही देशांमध्ये या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्ण बंदी आहे.
नेपाळ सरकारने अलीकडेच आपल्या देशात अनेक सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि लिंक्डइन यांसारख्या कंपन्यांना नेपाळमध्ये सात दिवसांच्या आत नोंदणी करण्याचं आदेश दिलं होतं. मात्र, या कंपन्यांनी ठरवलेल्या मुदतीत नोंदणी केली नाही. त्यामुळे नेपाळ सरकारने या अॅप्सवर बंदी लागू केली आहे.
या निर्णयानंतर देशात मोठ्या प्रमाणात आंदोलनं उसळली आहेत. तरुणांनी या बंदीविरोधात रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये भांडणं झाली, ज्यात काहींचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत.
advertisement
पण तसं पाहायचं झालं तर नेपाळ हा पहिला देश नाही ज्याने सोशल मीडियाबद्दल अशी पावलं उचलली आहेत. चीनमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या अॅप्सवर आधीपासूनच बंदी आहे. चीन स्वतःचे स्वदेशी अॅप्स वापरतो आणि बाहेरील अॅप्सना परवानगी देत नाही.
नॉर्थ कोरियामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडिया पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. सामान्य लोकांना सोशल मीडियाचा वापर करण्यास मनाई आहे. तर रशियाने युक्रेन युद्धाच्या काळात फेसबुक आणि एक्सवर (एक्स ट्विटर) बंदी घातली. इराणमध्ये 2009 पासून फेसबुक, एक्स, यूट्यूब आणि टेलिग्रामसारख्या अॅप्सवर बंदी आहे.
advertisement
नेपाळमधील हा निर्णय त्याच्या तरुणाईसाठी मोठा धक्का मानला जातोय. कारण सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर व्यवसाय, संवाद आणि करिअर घडवण्याचं महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे दे बंद व्हावं अशी देखील लोकांची इच्छा नाही. ज्यामुळे त्याचे तिव्र आंदोलन पाहायला मिळाली आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/Viral/
नेपाळ एकमेव देश नाही जिथे सोशल मीडियावर बंदी, 'या' देशामध्ये लोक अनेक वर्षांपासून वापरत नाहीत इंटरनेट