Aajache Rashibhavishya: गुरुवारी नशिबाचे दरवाजे उघडणार, पैसा, प्रेम आणि करिअर, तुम्हाला काय मिळणार? आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी गुरुवारचा दिवस नव्या संधी घेऊन येईल. प्रेम, पैसा, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, विवाह यांबाबत आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी -दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी -तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा.आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
कर्क राशी -कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.आज तुमचा शुभ अंक 3 आहे.
advertisement
सिंह राशी -आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल.आज तुमचे शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
कन्या राशी -तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैशाची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैशाची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे.आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
advertisement
वृश्चिक राशी -देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका.अचानक धन लाभ होण्याची शक्यता आज या राशींच्या लोकांना दिसत आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
धनु -मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काहीजणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमचा अंक 5 असणार आहे.
advertisement
मकर -तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल.आजचा दिवस कुशल असणार आहे. हातातील कामे मार्गी लावा.आज तुमचा शुभ अंक 5 असणार आहे
advertisement
कुंभ राशी -अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्याद फायदा मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मीन राशी -काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत आनंदी असणार आहे.आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement


