अरेरे! सुख नाहीच, पुढील 5 दिवस या राशींवर येणार मोठं संकट, नुकसान होणार, तुमचीही रास आहे का?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला मानवी जीवनातील बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यवहारज्ञान, गणिती विचार आणि निर्णयक्षमता यांचा प्रमुख कारक मानले जाते.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला मानवी जीवनातील बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, व्यवहारज्ञान, गणिती विचार आणि निर्णयक्षमता यांचा प्रमुख कारक मानले जाते. त्यामुळे बुधाच्या प्रत्येक हालचालीकडे ज्योतिष अभ्यासकांचे बारकाईने लक्ष असते. सध्या बुध ग्रहाने नक्षत्र परिवर्तन केल्याने त्याचा परिणाम काही राशींवर अधिक तीव्र स्वरूपात जाणवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या नक्षत्र बदलाचा प्रभाव १५ जानेवारी २०२६ पर्यंत टिकण्याची शक्यता असून या काळात काही राशींना विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
ज्योतिषीय गणनांनुसार बुध ग्रह सध्या धनू राशीत भ्रमण करत असून तो पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचा अधिपती शुक्र ग्रह असल्यामुळे बुध आणि शुक्र यांचा संयोग अप्रत्यक्षपणे विचारशैली, बोलण्याची पद्धत, आर्थिक निर्णय आणि मानसिक स्थैर्यावर परिणाम करू शकतो. या काळात संवादात गैरसमज होणे, उतावळेपणाने निर्णय घेणे किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवणे यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता काही ज्योतिष तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक मानले जात आहे.
advertisement
मेष - मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी मानसिक तणाव वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थता जाणवू शकते. करिअरविषयक संभ्रम, वरिष्ठांशी मतभेद किंवा जबाबदाऱ्यांचा ताण वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटू शकतो. घाईघाईने घेतलेले निर्णय पुढे अडचणी वाढवू शकतात. वाहन चालवताना किंवा जोखमीची कामे करताना विशेष काळजी घेणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये शब्दांचा तोल सांभाळला नाही, तर गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र परिवर्तन मानसिक अस्थिरता निर्माण करू शकते. मन सतत विचारांनी ग्रासलेले राहिल्यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळणे अत्यावश्यक ठरेल, कारण चुकीच्या खर्चामुळे किंवा गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेले काही निर्णय किंवा दुर्लक्षित राहिलेली कामे या काळात पुन्हा समोर येऊ शकतात. जानेवारीच्या मध्यावर आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात, त्यामुळे विश्रांती आणि दिनचर्येकडे लक्ष देणे हिताचे ठरेल.
advertisement
मीन - मीन राशीच्या व्यक्तींना या काळात कामाच्या ठिकाणी अतिरिक्त दबाव जाणवू शकतो. वरिष्ठांशी मतभेद, अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना किंवा जबाबदाऱ्यांचा ताण वाढू शकतो. आर्थिक निर्णय घेताना चुकीचा अंदाज घेतल्यास धनहानी होण्याची शक्यता असल्याने सावध राहणे गरजेचे आहे. मानसिक उदासीनता वाढल्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जवळच्या व्यक्तींशी संवादात गैरसमज होण्याची शक्यता असल्याने संयम आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक ठरेल.
advertisement








