Pune Crime: इन्स्टाग्रामवर झाली मैत्री; तिने मित्राने पाठवलेली ती लिंक उघडली अन्..., पुण्यात धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
तन्मय याने तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. काही दिवसांतच तिचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने तिला 'एम. परिवहन' नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले.
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर चोरट्यांनी आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फसवणुकीचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. चऱ्होली बुद्रुक येथील एका तरुणीसोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला. यात तरुणीचा विश्वास संपादन करून, तिच्या मोबाईलचा ताबा मिळवत तब्बल ९२ हजार ७९४ रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी तन्मय अमोल पांडे (वय १९, रा. यवतमाळ, सध्या रा. हिंजवडी) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तन्मय याने फिर्यादी महिलेच्या भाचीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. काही दिवसांतच तिचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने तिला 'एम. परिवहन' (M-Parivahan) नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी मोबाईलवर एक लिंक पाठवली. ही लिंक प्रत्यक्षात एक 'रिमोट ॲक्सेस' देणारे संशयास्पद सॉफ्टवेअर होते. तरुणीने त्या लिंकवरून ॲप डाऊनलोड करताच, आरोपीने तिच्या मोबाईलचा ताबा मिळवला. या तांत्रिक गैरफायद्यातून चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती मिळवून दोन दिवसांत ९२ हजार रुपयांहून अधिक रक्कम परस्पर वळवून घेतली.
advertisement
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने दिघी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. ही घटना १३ आणि १४ डिसेंबर दरम्यान घडली असून पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक डाऊनलोड करणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 6:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: इन्स्टाग्रामवर झाली मैत्री; तिने मित्राने पाठवलेली ती लिंक उघडली अन्..., पुण्यात धक्कादायक घटना










