Astrology: अजून आठ दिवस सोसावं लागणार! मघा नक्षत्रात ग्रहांचा राजकुमार आला की 3 राशींचा भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. बुध साधारणपणे 15 दिवसांनी राशी बदलतो. यासोबतच ठरावीक काळानंतर नक्षत्र देखील बदलतो, त्याचा परिणाम 12 राशींवर देखील दिसून येतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल आणि त्याच दिवशी तो मघा नक्षत्रातही संक्रमण करेल.
advertisement
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध 30 ऑगस्ट रोजी दुपारी 04:48 वाजता मघा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 06 सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. त्यानंतर तो पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशातील 27 नक्षत्रांपैकी मघा हे 10 वे नक्षत्र मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी केतु आहे आणि हा ग्रह पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतो.
advertisement
वृषभ राशी - या राशीच्या लोकांसाठी मघा नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. मनातील भावनांबद्दल मोकळेपणानं बोलू शकता. या स्थितीत तुमचे धाडस वाढेल. तुम्ही मोकळेपणानं संभाषण साधून मोठं काम करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे हलके वाटू शकता.
advertisement
सिंह राशी - या राशीच्या लोकांसाठी मघा नक्षत्रात बुध ग्रहाचे भ्रमण अनेक क्षेत्रात चांगले परिणाम देऊ शकते. या राशीच्या लोकांची बौद्धिक क्षमता वेगाने वाढू शकते. यासोबतच, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमची वाणी खूप प्रभावी असेल. संभाषणाद्वारे तुम्ही करिअर आणि व्यवसायात खूप सुधारणा करू शकता. समाजात आदर वाढू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आरोग्य चांगले राहील. परंतु अनावश्यक ताणतणावापासून दूर राहा. तुम्ही योग व्यायाम केल्यास आणखी शुभ परिणाम होऊ शकतात.
advertisement
वृश्चिक - बुध या राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळवून देऊ. नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते. बौद्धिक क्षमता वाढू शकते. तुमच्या वादविवाद करण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. बऱ्याच काळापासून सुरू असलेली समस्या आता सोडवता येईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.
advertisement
वृश्चिक - करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. भविष्यासाठी तुम्ही अनेक योजना बनवू शकता. यासोबतच, तुम्ही मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)