Astrology: थेट खात्यावर पैसा, या दिवशी चेक करा बँक बॅलन्स; बुध उदयानं या राशींना आर्थिक समाधान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Astrology: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असे म्हटले जाते की ज्यांच्यावर या ग्रहाचा आशीर्वाद असतो, ते आपल्या बुद्धिमत्तेने जीवनात खूप यश मिळवतात. हे लोक व्यवसाय क्षेत्रातही खूप नाव कमावतात. ९ ऑगस्ट २०२५ रोजी बुध कर्क राशीत उदय पावेल. या ग्रहाचा उदय होताच काही राशींचे भाग्य चमकेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश, आर्थिक लाभ मिळेल. एकंदरीत या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप भाग्यवान ठरेल.
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्कशक्ती, संवाद कौशल्ये, व्यापार, शिक्षण, आणि तंत्रज्ञानाचा कारक मानला जातो. हा ग्रह साधारणपणे २३ ते २८ दिवसांनी आपली रास बदलतो. जेव्हा बुध ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला बुध गोचर असे म्हणतात. या गोचराचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो, ज्यामुळे व्यक्तीच्या संवाद, निर्णयक्षमता, आर्थिक व्यवहार आणि शिक्षणाशी संबंधित बाबींवर प्रभाव पडतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांना या काळात जवळजवळ सर्वच क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल. व्यावसायिकांनाही नफा मिळण्याची शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)