तब्बल 100 वर्षांनी एकाच वेळी गजकेसरी अन् शश राजयोग, 3 राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ज्योतिष गणनेत ग्रह नक्षत्र आणि राशीफळ महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक कालावधीने आपले स्थान बदलतात आणि यामुळे शुभ आणि राजयोगचा तयार करतात. याचा प्रभाव जगभरासह 12 राशीच्या जातकांवर प्रभाव पाहायला मिळतो. (सर्वेश श्रीवास्तव/ अयोध्या, प्रतिनिधी)
शनि देव आता कुंभ राशीत आहे. त्याठिकाणी शनिग्रह शश राजयोग तयार करत आहे. तर 1 मे रोजी वृषभ राशीत गुरू ग्रहाने प्रवेश केला आहे. यासोबतच 9 मे रोजी चंद्रसुद्धा वृषभ राशीत प्रवेश करतील. यामुळे गज केसरी राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत शश आणि गजकेसरी राजयोग दोन्ही एकाच वेळी हा योग तब्बल 100 वर्षांनी तयार होत आहे. याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार आहे. मात्र, यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते.
advertisement
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. ज्योतिषीय गणनेनुसार, शनिदेव आता कुंभ राशीत आहेत. यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. तर गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. 9 मे रोजी चंद्रही वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे गज केसरी राजयोग तयार होईल. गजकेसरी राजयोग आणि शश राजयोग निर्माण झाल्याने तीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement