Astrology: गजलक्ष्मी राजयोग जुळलाय! या राशींचे आता नशीब उजळणार, गुरुचा उदय अपार संपत्ती-सुख देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. जवळपास १२ वर्षांनी मिथुन राशीत गुरू ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे गुरू आणि शुक्र ग्रहाची युती होईल. त्यातून गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.
advertisement
advertisement
कन्या - या काळात जीवनात सुखसोयी आणि सुविधा वाढतील कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते अधिक दृढ होईल.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीच्या भाग्य स्थानात तयार होईल. त्यामुळे याकाळाक तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तसेच, तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तिथे तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. जर तुम्ही कोणत्याही सर्जनशील कामात सहभागी असाल तर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातही चांगले निकाल मिळतील. तसेच, यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)