Astrology: हत्ती गेला शेपूट राहिली! अजून थोडा काळ सोसावं लागणार; तिसरा टप्पा संपला की आनंदी-आनंद
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: ज्योतिषशास्त्रात शनिच्या स्थितीला महत्त्व आहे. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदलतात. या वर्षी मार्चमध्ये शनिने मीन राशीत संक्रमण केले असून आता जून २०२७ पर्यंत मीन राशीत राहणार आहे. यामुळे मेष, मीन आणि कुंभ राशींवर शनिच्या साडेसातीचा परिणाम दिसत आहे. सिंह आणि धनु राशींना अडीचकीचा परिणाम पाहायला मिळेल. शनीची साडेसाती साडेसात वर्षे प्रभाव दाखवते आणि त्याचे ३ चरण असतात. साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीवर सुरू आहे.
advertisement
शनिदेव कुंभ राशीचे स्वामी आहेत आणि ही त्यांची मूळ त्रिकोण रास आहे. त्यामुळे, शनी कुंभ राशीच्या लोकांवर कृपा करणार आहेत. कुंभ राशीवरील साडेसातीच्या प्रभावाचा विचार केला तर, शेवटची टप्पा या लोकांना खूप फायदेही देऊ शकतो. परंतु, २०२९ पर्यंत या लोकांनी त्यांच्या कर्मांबद्दल खूप काळजी घेतली पाहिजे. कारण साडेसातीच्या काळात, शनी कर्मांवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि त्यानुसार फळ देईल.
advertisement
advertisement
advertisement
दारू आणि मांस सेवन करू नका. शनिवारी संध्याकाळी शनिदेवाला तेल अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. गरीब आणि गरजूंना शक्य तितकी मदत करा. यामुळे साडेसातीचे वाईट परिणाम सोसावे लागणार नाहीत.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)