Weekly Rashi Bhavishya In Marathi: धनू, मकर, कुंभ, मीन साप्ताहिक राशीभविष्य; आठवड्यात 'कभी खुशी, कभी गम'
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Rashi Bhavishya In Marathi: फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा काही राशीच्या लोकांना लाभदायी तर काही राशीच्या लोकांना त्रासाचा ठरू शकतो. 10 ते 16 फेब्रुवारी 2025 या आठवड्यात बरेच राजयोग तयार होणार आहेत. याशिवाय इतर ग्रह शुभ आणि अशुभ योग निर्माण करत आहेत. याचा धनू, मकर, कुंभ, मीन राशींवरील साप्ताहिक परिणाम पाहुया.
धनू (Sagittarius) : या आठवड्यात यशाचे योग आहेत. हा काळ मौजमजा सोडून, समोर येणाऱ्या मोठ्या संधींचा पूर्ण लाभ घेण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळाली, तर ती सर्वोत्तम रीतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वेळ तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचंही सहकार्य मिळेल. लोक तुमचं बोलणं ऐकतील आणि तुमच्या कौशल्याची आणि मेहनतीची प्रशंसाही करतील. व्यवसायाशी संबंधित पूर्वी घेतलेले निर्णय नफ्याचं कारण ठरतील. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रवास फायद्याचे ठरतील.
advertisement
धनू - सत्ता आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मदतीने मोठे लाभ मिळू शकतात. एखाद्या मोठ्या आणि फायदेशीर योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल. कुटुंबीय तुमच्या प्रेमसंबंधांना स्वीकारून विवाहासाठी संमती देऊ शकतात. जोडीदाराशी संबंधित एखादी शुभ बातमी संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाचं कारण बनेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य सर्वसाधारण राहील.
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 9
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 9
advertisement
मकर (Capricorn) : हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे मन थोडं अस्वस्थ राहील. कामातले अडथळे आणि नातेसंबंधांतली कटुता हे चिंतेचं मोठं कारण ठरू शकतं. या काळात कौटुंबिक समस्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. राजकारणाशी संबंधित व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देताना अतिशय विचारपूर्वक वागावं. अन्यथा विनाकारण अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
मकर - विरोधक तुमच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात सहकार्य नसल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. विरोधक सक्रिय राहतील. त्यामुळे तुम्हाला अधिक सावध राहावं लागेल. या काळात सट्टा, शेअर्स आदींपासून दूर राहा. प्रेमसंबंधांबाबत पुढे जाण्याचा विचार करत असलात, तर व्यक्त होणं टाळा. अन्यथा अपमानित होण्याची वेळ येऊ शकते.
Lucky Color : Brown
Lucky Number : 11
Lucky Color : Brown
Lucky Number : 11
advertisement
कुंभ (Aquarius) : या आठवड्यात काही वेळा आनंदाची, तर काही वेळा दुःखाची स्थिती असेल. पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळवण्यासाठी प्रतीक्षा करत असाल, तर आठवड्याच्या सुरुवातीला ही इच्छा पूर्ण होऊ शकते. यासोबतच काही समस्याही येतील. विरोधक गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील; पण तुमची तब्येत येणाऱ्या संधींमध्ये अडथळा बनेल. अशा स्थितीत दिनचर्या आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. अन्यथा हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. हंगामी आजारांविषयी सतर्क राहा.
advertisement
advertisement
मीन (Pisces) : या आठवड्यात नशिबाचा योग आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घरात काही धार्मिक किंवा शुभकार्य होऊ शकतं. बऱ्याच काळानंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटून मन आनंदित होईल. सत्तेशी किंवा सरकारशी संबंधित एखादी गोष्ट दीर्घ काळ अडकलेली असली, तर या आठवड्यात त्यात यश मिळवू शकाल. सरकारचा निर्णय तुम्हाला अनुकूल राहील. नोकरदार व्यक्तींच्या कामासाठी बॉस प्रशंसा करील आणि अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील.
advertisement
मीन - व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळेल आणि तो पुढे नेण्याच्या संधी प्राप्त होतील. व्यवसायासाठी केलेले अनेक प्रवास सुखद आणि फायदेशीर ठरतील. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुप्रतीक्षित यश मिळू शकेल. गृहिणी या आठवड्यात बहुतेकसा वेळ धार्मिक कार्यांमध्ये व्यतीत करतील. प्रेमाच्या बाबतीत तुमची गाडी वेगाने ट्रॅकवर धावणार आहे. प्रेमसंबंध अधिक चांगले होतील आणि जोडीदारासह चांगला काळ घालवता येईल. विवाहित जीवन सुखी राहील. मुलांचं यश हे आनंदाचं मुख्य कारण असेल.
Lucky Color : Cream
Lucky Number : 12
Lucky Color : Cream
Lucky Number : 12