September Horoscope: कष्टाचं फळ आता मिळणार! सप्टेंबर महिना 3 राशींना शुभफळदायी, शनी कृपा पाठीशी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
September Horoscope: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना खूप महत्त्वाचा असू शकतो. या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी तसेच नक्षत्र बदलतील, ज्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येणार आहे. सप्टेंबर महिन्यात 13 सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. तसेच तो चित्रा आणि स्वाती नक्षत्रात राहील. या महिन्यात रवि, बुध ते शुक्र हे ग्रह राशीसह नक्षत्र बदलतील. त्यामुळे हा महिना काही राशींच्या लोकांसाठी चांगला असू शकतो, तर काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या राशींना भाग्याची साथ मिळू शकते, जाणून घेऊया.
सप्टेंबरमध्ये काही ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. मंगळ ग्रह या महिन्यात तीन वेळा आपली स्थिती बदलेल, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढेल. तसेच धन, संपत्ती आणि वैवाहिक सुखाचा कारक ग्रह असलेला शुक्र सप्टेंबरमध्ये आपली राशी बदलेल. 15 सप्टेंबर रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या या संक्रमणामुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
छाया ग्रह राहू आपली राशी बदलत नसला तरी, तो नक्षत्र परिवर्तन करेल. 21 सप्टेंबर रोजी राहू पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. राहूच्या या बदलामुळे काही राशींच्या नशिबात सकारात्मक बदल घडू शकतात. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य देखील आपली राशी बदलेल, त्याला संक्रांती म्हणतात. 17 सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल, याला कन्या संक्रांती असेही म्हणतात. सूर्याच्या या बदलामुळे सरकारी कामात किंवा नोकरीमध्ये यश मिळण्याचे योग निर्माण होतात.
advertisement
advertisement
मेष - सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी खूप खास राहणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. मंगळ तूळ राशीत जाताच, या राशीच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास जबरदस्त वाढू शकतो. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. समाजात आदर वाढू शकतो. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. सर्वोत्तम परिणामांसाठी प्रवाळ रत्न धारण करा आणि हनुमानाची पूजा करा.
advertisement
मिथुन - गुरू ग्रह या राशीच्या लग्न भावात बसला आहे. यासोबतच, बुध कन्या राशीत गेल्यानं भद्र महापुरुष नावाचा राजयोग तयार होईल. त्यानं या राशीच्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. भौतिक सुखांमध्ये वाढ होण्यासोबतच मान-सन्मानातही वाढ होईल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. वाहन, घर, जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. शुभ परिणाम मिळविण्यासाठी पन्ना रत्न धारण करा. हिरव्या रंगाच्या वस्तू दान करणे फायदेशीर ठरेल.
advertisement
कर्क - सप्टेंबर महिन्यात या राशीच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या राशीचा स्वामी चंद्र एखाद्या ग्रहाशी युती करून शुभ योग निर्माण करेल, ज्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. यासोबतच, सूर्याने बुधादित्य राजयोग तयार केल्यानं या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर फायदा होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. या राशींव्यतिरिक्त सिंह, तूळ, धनु राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)