ShaniDev: आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त! शनिदेव मेहरबान असल्यानं अजून 2 वर्षे या राशींना चिंताच नाही
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Astrology: सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने आपली राशी बदलतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात. अशा प्रकारे संथ गतीनं त्याचे राशीचक्र 30 वर्षांनी पूर्ण होते. सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान असून चांदीच्या पायांनी तीन राशींवर कृपा करत आहेत.
advertisement
advertisement
कर्क - शनिदेव सध्या कर्क राशीवर चांदीच्या पायांनी चालत आहे, ज्यामुळे या राशींना चांगला काळ जात आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी-त्रासांपासून तुम्हाला दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त चांगली असेल. नोकरीच्या ऑफर येतील. प्रेम जीवनही चांगले राहील. व्यवसाय चांगला चालेल. २०२७ पर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे.
advertisement
वृश्चिक - शनिदेव सध्या चांदीच्या पायांनी वृश्चिक राशीवर चालत आहे. अशा परिस्थितीत २०२७ पर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी देखील चांगला आहे. कुंडलीत शनीची स्थिती मजबूत असल्यानं हा काळ तुम्हाला खूप प्रगती करण्यास मदत करेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या पगारात अचानक वाढ होऊ शकते. शेअर बाजारात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.
advertisement
कुंभ - कुंभ राशीवर आता शनि चांदीच्या पायांनी चालत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप चांगला आहे. तुमच्या नोकरीत अचानक बदल होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकतो. नवीन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)