Solapur Crime : 'सॉरी पब्लिक...', सोलापूरात प्रसिद्ध Reel Star ने उचललं टोकाचं पाऊल, शेवटचा Video शेअर करत म्हणाला, 'माझ्या आईची...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Solapur Crime Prajwal Kainure Reel Star : प्रज्वलने आपल्या भावना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका मेसेजद्वारे व्यक्त केल्या होत्या. इन्टाग्रामवर रील शेअर करत त्याने टोकाचं पाऊल उचललं.
Solapur Reel Star Case : सोलापुरात एका रील स्टार असलेल्या तरुणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या शेळगी भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रज्वल कैनूर (Prajwal Kainure) असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रज्वलने आपल्या भावना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एका मेसेजद्वारे व्यक्त केल्या होत्या. इन्टाग्रामवर रील शेअर करत त्याने टोकाचं पाऊल उचललं.
'आज हम है, कल हमारी याद होगी'
प्रज्वलने आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने 'आज हम है, कल हमारी याद होगी' असा भावनिक संदेश लिहिला होता. याशिवाय, प्रज्वलने दोन फोटो शेअर करत संदेशाद्वारे आपले दुःख दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने दुसऱ्या एका पोस्टमध्ये आपल्या मित्रांची आणि चाहत्यांची 'सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेत आहे' असे म्हणत माफी मागितली होती.
advertisement
माझी आई, माझा भावाची काळजी घ्या
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रज्वलने आपल्या शेवटच्या रीलमध्ये आपल्या कुटुंबासाठी एक भावनिक संदेश दिला. त्याने 'माझी आई, माझा भावाची काळजी घ्या' अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी तो काहीसा भावूक दिसत होता. त्याने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर सोशल मीडियावर रील डिलीट करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला
प्रज्वल हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता, पण तो चरितार्थासाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला होता. प्रील स्टार असलेल्या एका तरुणाने इतका टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 26, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : 'सॉरी पब्लिक...', सोलापूरात प्रसिद्ध Reel Star ने उचललं टोकाचं पाऊल, शेवटचा Video शेअर करत म्हणाला, 'माझ्या आईची...'