अजब प्रकरण! कर्मचाऱ्याचा फोन पाहून भडकला बॉस, कामावरूनच काढून टाकलं

Last Updated:

Boss Fired Employee : एखाद्या बॉसने कर्मचाऱ्याचा फोन पाहून त्याला कामावरून काढून टाकलं असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. पण असं घडलं आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहुयात.

News18
News18
नवी दिल्ली : कर्मचाऱ्याला कंपनीतून किंवा कामावरून काढून टाकल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. याची वेगवेगळी कारणं असतात. पण एखाद्या बॉसने कर्मचाऱ्याचा फोन पाहून त्याला कामावरून काढून टाकलं असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. पण असं घडलं आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आहे, पाहुयात.
चीनमधील ही घटना आहे. जियांग्सू प्रांतातील चेन या कर्मचाऱ्याने पाठदुखी होत असल्याचं सांगत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दोनदा आजारपणाच्या रजेसाठी अर्ज केला. त्याने कंपनीला डॉक्टरांचा रिपोर्टही दिला. सुमारे एक महिना विश्रांती घेतल्यानंतर तो परतला. पण अर्धा दिवस काम केल्यानंतर त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला. तेव्हा त्याने त्याच्या उजव्या पायात वेदना होत असल्याचं सांगितलं. चेनने पुन्हा मेडिकल सर्टिफिकेट सादर केलं आणि त्याची रजा वाढवली तेव्हा कंपनीला संशय आला.
advertisement
कंपनीने त्याला कागदपत्रं ऑफिसमध्ये जमा करायला सांगितलं. पण जेव्हा तो आला तेव्हा एका सुरक्षारक्षकाने त्याला आत जाण्यापासून रोखलं. काही दिवसांनी कंपनीने त्याला फोन करून सांगितलं की त्याला खोटं बोलल्याबद्दल आणि गैरहजर राहिल्याबद्दल कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.
कंपनीने सीसीटीव्ही फुटेज आणि चॅट रेकॉर्ड्स कोर्टात सादर केले, ज्यामध्ये असं दिसून आलं की चेनने सुट्टी घेतली त्या दिवशी तो 16000 पावलं चालला होता आणि तो कंपनीकडे धावतानाही दिसला. कंपनीने असा दावा केला की तो आजारपणाचं नाटक करत होता. चेन म्हणाला की अॅपची पावलं मोजणं कधीकधी चुकीचं असतं आणि डॉक्टर किंवा रुग्णालयात औषधोपचारासाठी गेल्यानंतरही चालण्याचा इतका उच्च दर शक्य आहे. त्याने कोर्टाला त्याच्या कंबर आणि पायांचे मेडिकल स्कॅनदेखील दाखवले.
advertisement
प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने कंपनीने कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे काढून टाकल्याचं आढळून आलं. न्यायालयाने कंपनीला चेनला 118779 युआन म्हणजे सुमारे 16700 अमेरिकन डॉलर्स भरपाई देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे चिनी सोशल मीडियावर कामगारांच्या हक्कांबद्दल जोरदार वादविवाद सुरू झाला. कंपनीला कर्मचाऱ्यांचे स्टेप काउंटर किंवा हेल्थ अॅप डेटा तपासण्याचा अधिकार नाही. जरी कोणी 16000 पावलं चाललं तरी याचा अर्थ असा नाही की ते आजारी नव्हते, असं युझर्सनी म्हटलं आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
अजब प्रकरण! कर्मचाऱ्याचा फोन पाहून भडकला बॉस, कामावरूनच काढून टाकलं
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement