डेंजरस इश्क! सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीच्या प्रेमामुळे 11 राज्यांच्या पोलिसांची झोप उडाली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman Danger Love : तरुणाच्या प्रेमात तरुणीने असा कट रजला की 11 राज्यांतील पोलिसांना धक्का बसला आहे. तिचं रहस्य उघड झालं आणि तिला अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : प्रत्येक जण आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रेमात पडतो. प्रेमात व्यक्ती काहीही करायला तयार असतात. अशीच एक वेडी प्रेम कहाणी. ज्यात सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणी एका तरुणाच्या प्रेमात पडली. पण तिच्या प्रेमामुळे 11 राज्यांच्या पोलिसांची झोप उडाली. बंगळुरूतील हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
रेने जोसिल्डा असं या महिलंचं नाव. ती सॉफ्टेवेअर इंजिनीअर आहे. रेनी एका तरुणाच्या प्रेमात होती. तिने त्याला प्रपोज केलं पण त्याने तिला नकार दिला. रेनी तरुणाचा हा नकार पचवू शकली नाही. तिने धक्कादायक पाऊल उचललं. आपल्याला मिळालेल्या नकाराचा तिने सूड उगवण्याचं ठरवलं. यासाठी तिने खतरनाक कट रचला. तिने ईमेलच्या धमक्या देऊन त्याला अडकवण्याची योजना आखली.
advertisement
Tata कंपनीच्या वुमन्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा, तिथल्याच एका तरुणीने लावला; Shocking कारण
बंगळुरू पोलिसांच्या नॉर्थ डिव्हिजन सायबर क्राईम युनिटने रेनेला अटक केली. प्राथमिक तपासात असं दिसून आलं की तिने बंगळुरूमधील सहा ते सात शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल पाठवले होते. शिवाय, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातसह 11 राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या धमकीचे ईमेल पाठवल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेनेने फक्त शाळाच नाही तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमसारख्या सार्वजनिक ठिकाणीही बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती, असं पोलीस तपासात समोर आलं.
advertisement
जून 2025 मध्ये अहमदाबाद पोलिसांनी रेने जोसिल्डाला पहिल्यांदा अटक केली होती. नंतर बंगळुरू पोलिसांनी केलेल्या तपासात असं दिसून आलं की तिने कर्नाटकातील अनेक शाळांना धमकीचे ईमेल देखील पाठवले होते. त्यानंतर तिला बॉडी वॉरंटवर बंगळुरूला आणण्यात आलं, जिथं आता तिची सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "गुजरात विमान अपघाताप्रमाणे मी तुमच्या शाळा उडवून देईन." या धमकीमुळे पोलीस आणि शाळा व्यवस्थापन दोघांमध्येही घबराट निर्माण झाली.
advertisement
तपासात असं दिसून आलं की रेने तिची ओळख आणि ठिकाण लपवण्यासाठी व्हीपीएन वापरत असे. 'गेट कोड' नावाच्या अॅपद्वारे व्हर्च्युअल मोबाइल नंबर तयार करून ती अनेक बनावट खाती चालवत असे. तिच्याकडे सहा ते सात सक्रिय व्हॉट्सअॅप अकाउंट असल्याचं आढळून आलं. ज्यांचा वापर धमकीचे ईमेल आणि संदेश पाठवण्यासाठी केला जात असे.
advertisement
पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या विशेष पथकाने आरोपीच्या सायबर नेटवर्कचा पर्दाफाश केला. सध्या, सहआयुक्त (पश्चिम) वंशी कृष्णा आणि डीसीपी (उत्तर) नेममेगौडा यांच्या नेतृत्वाखालील बंगळुरू पोलिसांचं विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की हे प्रकरण एका संघटित सायबर दहशतवादाच्या प्रयत्नाचा भाग असू शकतं आणि अनेक राज्यांतील एजन्सी संयुक्तपणे याचा तपास करत आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 07, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/Viral/
डेंजरस इश्क! सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीच्या प्रेमामुळे 11 राज्यांच्या पोलिसांची झोप उडाली


