Durga Favourite Zodiac Sign: देवी दुर्गेच्या या आहेत प्रिय राशी! गरीब घरात जन्म घेऊनही उभा करतात साम्राज्य
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shardiya Navratri 2025 Durga Priya Rashi : 2025 सालचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे, यंदा दुर्गा देवीची पूजा नऊ दिवसांऐवजी 10 दिवस केली जाईल. दरवर्षी, शारदीय नवरात्र आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला सुरू होते आणि नवमी तिथीला कन्या पूजा केल्यानंतर दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. या वर्षी नवरात्रात खास ग्रहसंयोजन दिसून येत आहे.
नवरात्रात गजकेसरी योग, बुधादित्य योग आणि त्रिग्रही योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे या नवरात्राचं महत्त्व वाढलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, देवी दुर्गेचा काही राशींवर नेहमीच आशीर्वाद राहतो. या तिच्या आवडत्या राशी आहेत आणि देवी दुर्गा त्यांच्यावर कोणतेही संकट येण्यापूर्वी त्यांना आशीर्वाद देते. चला माँ दुर्गेच्या आवडत्या राशींबद्दल जाणून घेऊया...
advertisement
वृषभ - देवी शैलपुत्री आणि महागौरीचे वाहन वृषभ आहे. म्हणूनच, वृषभ ही दुर्गेची आवडती राशी आहे. या राशीचे लोक कठोर परिश्रमाने प्रत्येक टप्पा गाठतात आणि धैर्याने प्रत्येक संकटाचा सामना करतात. वृषभ राशीचे लोक दुर्गेकडून मिळालेल्या प्रचंड धैर्य आणि शौर्याने काम करतात. वृषभ राशीचे लोक घाईघाईने कोणतेही निर्णय घेत नाहीत किंवा कृती करत नाहीत; ते पुढे जाण्यापूर्वी संयमानं परिस्थितीचे मूल्यांकन करतात.
advertisement
कर्क - कर्क राशीवर चंद्राचे अधिराज्य असून चंद्रकोर दुर्गेचे तिसरे रुप चंद्रघंटा मातेच्या कपाळावर आहे. म्हणूनच, कर्क ही देवी दुर्गेच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. देवी दुर्गेच्या कृपेनं कर्क राशीचे लोक वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होतात आणि त्यांचा स्वभावही शांत असतो. या राशीचे लोक त्यांच्या आईशी खूप कनेक्टेड असतात. प्रत्येक काम शांत मनाने करतात. या राशीचे लोक धार्मिक कार्यात खूप रस घेतात.
advertisement
सिंह - देवी दुर्गेचे वाहन सिंह असल्यानं आणि या राशीचे प्रतीक देखील सिंह असल्यानं सिंह ही देवी दुर्गेच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. सिंह नेहमीच उत्साही आणि धार्मिक असतात. देवी दुर्गेच्या कृपेने त्यांना नशिबाची साथ मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक बनवतात. सिंह राशीचे लोक नेहमीच इतरांना मदत करतात, करिअर आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती करण्यास तयार असतात.
advertisement
कन्या - कन्या ही देवी दुर्गाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. नवरात्रोत्सवाचा समारोपाला कन्या पूजन होते. मुलींना देवी दुर्गेचे प्रतीक मानले जाते आणि या राशीचे प्रतीक कन्या आहे. कन्या राशी नेहमीच धार्मिक कार्यात आघाडीवर असतात आणि खूप उत्साही असतात. कन्या राशीच्या लोकांना प्राणी असो वा मानव, कोणालाही दुःखात पाहणे सहन होत नाही, म्हणून ते सर्वांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण होतात.
advertisement
धनु - माता दुर्गेची धनुष्यासह अनेक शस्त्रे आहेत. धनु राशीचे प्रतीक धनुष्य आहे, ते माता देवीने देखील हातात धरलं आहे. तसेच, देवतांचा गुरू, बृहस्पति या राशीचा अधिपती आहे. धनु राशीचे लोक आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास आणि त्यांच्या ज्ञानाने सर्वांना मार्गदर्शन करण्यास सक्षम असतात. नोकरी आणि व्यवसायात असलेले लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतात आणि त्यांना आदर मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)