लॉटरी लागणार! मार्चमध्ये शुक्र बदलणार 4 वेळा चाल, 12 राशींमधल्या 'या' 2 ठरणार सुपरलकी; होणार मालामाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात, ग्रहांच्या हालचालींना खूप महत्व आहे. ग्रहांची बदलणारी चाल ग्रहांच्या हालचालीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो असे मानले जाते. विशेषतः शुक्र, जो आनंद, प्रेम, समृद्धी आणि भौतिक संपत्तीचा ग्रह मानला जातो.
advertisement
ज्योतिषशास्त्रामध्ये वैभव, ऐश्वर्य आणि धनसंपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह मार्च 2026 मध्ये आपल्या चालीत महत्त्वाचे बदल करणार आहे. 2 मार्च रोजी शुक्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करेल, जिथे तो अत्यंत बलवान मानला जातो. या काळात शुक्र नक्षत्रांचेही वारंवार परिवर्तन करणार असल्याने, हा महिना काही राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे.
advertisement
ज्योतिषांच्या मते, 2 मार्च 2026 रोजी शुक्र आपली राशी बदलेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12:57 वाजता, शुक्र कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल. 4 मार्च रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात संक्रमण होईल. तर 15 मार्चला रेवती नक्षत्रात संक्रमण करेल. 26 मार्च रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. या काळात अनेक राशींना आनंद, समृद्धी आणि नवीन संधी मिळू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
कर्क - भाग्योदयाचा काळ: कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे संक्रमण भाग्यस्थानात होणार आहे. प्रदीर्घ काळ रखडलेली तुमची कामे आता पूर्ण होतील. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी व्यवसायातून लाभ मिळण्याचे योग आहेत. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुमचे उत्पन्न अनपेक्षितपणे वाढू शकते. धार्मिक कार्यातून मानसन्मान मिळेल.
advertisement
धनु - मालमत्ता आणि सुखात वाढ: धनु राशीच्या चौथ्या भावात शुक्र गोचर करणार आहे. नवीन घर किंवा आलिशान वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकते. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. कुटुंबातील संपत्तीशी संबंधित जुने वाद सुटतील आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








