advertisement

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक

Last Updated:

द्रौपदी मुर्मू यांनी ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केले. नरेंद्र मोदी यांनी राजाजी उत्सवाचे कौतुक केले.

News18
News18
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा ठाम संकल्प या उपक्रमातून प्रतिबिंबित होतो. राजाजी हे विद्वान अभ्यासक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि कुशल प्रशासक होते. त्यांचे जीवन प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
advertisement
राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन येथे आयोजित ‘राजाजी उत्सवा’लाही उपस्थिती दर्शविली. ‘राजाजी उत्सव’ अंतर्गत राजाजी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजाजी उत्सव’ हा  राष्ट्राप्रति  राजाजी यांच्या बहुआयामी योगदानाचे विविध पैलू समोर आणणारा उपक्रम असल्याचे सांगितले. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन त्यांच्या जीवनातून आणि आदर्शांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
advertisement
राष्ट्रपतींच्या संबंधित उपक्रमांविषयीच्या ‘एक्स’वरील संदेशांना प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ‘एक्स’वर नमूद केले  :
“देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा ठाम संकल्प दर्शविणारा हा प्रशंसनीय उपक्रम आहे.
राजाजी हे महान विद्वान, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत आणि प्रशासक होते. त्यांचे जीवन प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते.”
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित ‘राजाजी उत्सवा’चे पंतप्रधानांकडून कौतुक
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement