Guru-Shukra: गुरूचा महिमा, शुक्राचा पैसा! 5 जूनपासून या राशींवर डबल कृपादृष्टी; डंका वाजणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Guru Effect: गुरू आणि शुक्राची स्थिती जून महिन्यात अनेक राशींसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या दोन ग्रहांच्या स्थितीचा राशींवर चांगला परिणाम दिसून येईल. 5 जून 2025 रोजी शुक्र आणि गुरु एकमेकांच्या 60 अंशांच्या कोनीय स्थितीत असतील.
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - गुरु आणि शुक्राची स्थिती कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते. कामात उत्साह, तेज प्रचंड असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. आत्मविश्वास वाढेल, मते प्रभावीपणे सादर करण्याची क्षमता वाढेल. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरी असलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वाढ आणि पदोन्नती मिळू शकते.
advertisement
तूळ - गुरू आणि शुक्राच्या स्थितीचे चांगले परिणाम तूळ राशीच्या लोकांना मिळू शकतात. आपल्याला व्यवसायात भागीदारीचा फायदा होईल. सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग वाढेल. या काळात आपल्याला स्पर्धा आणि करिअरमध्ये यश मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींवर वेळ काढाल त्यामुळे आपल्याला आराम मिळेल. आपण परदेशात प्रवास करू शकता. आपण यावेळी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







