Astrology: मोठ्या चिंतेतून दिलासा! अंगारकी संकष्टीला बाप्पा देणार 4 राशीच्या लोकांना बिग सरप्राईज
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Angarki 2025 lucky Zodiac Signs: अंगारकी संकष्ट चतुर्थी आज मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. हिंदू धर्मात अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा दिवस खूप खास असणार आहे. अंगारकी संकष्टीचा योग वर्षातून एक किंवा दोनवेळाच जुळून येतो. त्यामुळे अंगारकीला वेगळ महत्त्व प्राप्त झालं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अंगारकी दिवशीच शनि आणि अरुण (युरेनस) यांचे दुर्मीळ संयोजन होत आहे, याचा 4 राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो.
advertisement
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, अंगारकीला शनि आणि अरुण एकमेकांपासून 60 अंशांवर उपस्थित असतील, ज्यामुळे एक अतिशय शक्तिशाली त्रिकादश योग तयार होणार आहे. त्रिकादश योगाच्या शुभ प्रभावामुळे, या राशीच्या विशेषत: महिलांचे सुख आणि सौभाग्य वाढेल आणि संपत्ती दरवाजे उघडतील. अंगारकीला शनि-अरुणचा शुभ योग कोणत्या राशींसाठी खास असेल जाणून घेऊया.
advertisement
वृषभ - शनि-अरुणच्या दुर्मीळ युतीमुळे बनणाऱ्या त्रिकादश योगाचा शुभ प्रभाव वृषभ राशीला मिळेल. या राशीच्या कुटुंबात आनंद आणि शांती राहील, करिअर नव्यानं सुरू करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील आणि सासरच्या लोकांशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या काळात तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, तुम्ही तुमची छाप पाडू शकाल.
advertisement
कर्क - त्रिकादश योगाचा शुभ प्रभाव कर्क राशीवर खूप खास राहणार आहे. कर्क राशीच्या विवाहित महिलांचे वैवाहिक जीवन सुखी राहील आणि कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल. या राशीच्या नोकरदार महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे अडकलेले महत्त्वाचे काम होईल, त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. या राशीच्या अविवाहित मुलींसाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने विवाहासाठी चांगले स्थळ मिळू शकते.
advertisement
वृश्चिक - शनि-अरुण यांच्या दुर्मीळ युतीमुळे वृश्चिक राशीचे सुख-सौभाग्य वाढेल, नशिबाच्या साथीनं अडकलेले काम वेळेवर पूर्ण होईल. हा योग तुमच्या आयुष्यात आनंद आणेल आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर पालकांचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला पैसे मिळण्याची आणि करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत काही मतभेद असतील तर या योगाच्या शुभ प्रभावामुळे सर्व गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये गोडवा येईल.
advertisement
कुंभ - शनि-अरुणच्या दुर्मीळ युतीमुळे निर्माण झालेला त्रिकादश योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल, तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुमचे कोणतेही काम अडकले असेल तर या काळात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)