अरे देवा! नवीन आठवडा या राशींना ठरणार धक्कादायक,एकामागोमाग येणार मोठी संकटं
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Weekly Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा अनेक महत्त्वाच्या ग्रहबदलांचा साक्षीदार ठरणार आहे. या कालावधीत काही ग्रह नक्षत्र बदल तर काही राशी परिवर्तन करणार आहेत.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा अनेक महत्त्वाच्या ग्रहबदलांचा साक्षीदार ठरणार आहे. या कालावधीत काही ग्रह नक्षत्र बदल तर काही राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे या आठवड्याचा परिणाम दोन महत्त्वाच्या राशींवर कुंभ आणि मीन विशेषत्वाने जाणवू शकतो. व्यवसाय, करिअर, आरोग्य तसेच वैयक्तिक नातेसंबंध या सर्व क्षेत्रांवर या ग्रहस्थितीचा प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही राशींसाठी साप्ताहिक भविष्य.
advertisement
advertisement
करिअरच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक असूनही प्रगतीची दारं खुली करणारा आहे. नोकरी करणाऱ्यांना अचानक नवीन जबाबदाऱ्या किंवा ताण जाणवू शकतो. मात्र योग्य नियोजन आणि संयमाने तुम्ही या परीक्षेत यशस्वी ठराल. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन धोरणं किंवा प्रयोग करण्यास मागे राहू नये. कामानिमित्त प्रवासाची शक्यता असून हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत हा आठवडा काही प्रमाणात आव्हाने घेऊन येईल. अनपेक्षित खर्च किंवा गुंतवणुकीत अडथळे दिसू शकतात.
advertisement
मीन रास - मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात संतुलन साधणारा आहे. घरातील वातावरण प्रेमळ राहील. नातेसंबंधात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवल्यास मतभेद दूर होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा स्थिरता देणारा आहे. नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळणे किंवा नवीन व्यवहाराची संधी मिळणे शक्य आहे. मात्र, निर्णय घेताना घाई न करता फोकस कायम ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
आर्थिक स्थिती सुधारण्याची मोठी शक्यता आहे. जुन्या कामांमध्ये यश मिळेल तसेच नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील.आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आहारात स्वच्छ, हलके आणि घरगुती पदार्थांवर भर द्या. बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. नियमित योग आणि पाण्याचे सेवन यामुळे शरीर तंदुरुस्त राहील.


