advertisement

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; प्लॅन सक्सेस, मार्चचा दुसरा आठवडा भाग्याचा?

Last Updated:
Weekly Horoscope: मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होणार आहे. आठवड्यात बहुतेक राशींसाठी संमिश्र पण प्रगतीकडे नेणारे निकाल पाहायला मिळतील. मेष, वृषभ, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लय खास आणि भाग्याचा असणार आहे. तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील, करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग उघडतील आणि वरिष्ठांची चांगली साथ मिळेल. पैशांचा फायदा आणि नवीन जबाबदाऱ्यांमुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
1/7
या आठवड्यात सिंह राशीसाठी परिस्थिती कधी चांगली तर कधी कठीण अशी असेल. सुरुवातीला नशीब तुमच्या बाजूने असल्यामुळे कामं वेळेवर होतील, पण आठवड्याच्या दुसऱ्या भागात कामाशी संबंधित समस्या चिंता वाढवू शकतात. या आठवड्यात डोकं आणि मन दोन्ही ठिकाणावर ठेवून वागा. भावनेच्या भरात किंवा घाईघाईत करिअर किंवा बिझनेसचे निर्णय घेऊ नका, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. काम पुढे ढकलण्याची सवय सोडा.

2/7
सिंह राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. सुरुवातीला खर्च जास्त असतील; चैनीच्या गोष्टींवर किंवा फिरण्यावर गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. उत्तरार्धात घरगुती प्रश्न सतावतील आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत हा काळ थोडा कठीण आहे. स्वतःच्या तब्येतीसोबतच आईच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. थोडा जरी त्रास वाटला तरी डॉक्टरकडे जायला उशीर करू नका. वैवाहिक सुख मध्यम राहील, नातं टिकवण्यासाठी प्रामाणिक राहा आणि जोडीदाराला समजून घ्या.लकी कलर: आकाशी, लकी नंबर: 1

3/7
कन्या राशीसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात दुखापत होण्याची किंवा चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे वाहन चालवताना आणि सामानाची काळजी घ्या. सुरुवातीला तुम्ही धार्मिक आणि घरगुती कामात व्यस्त असाल. अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आठवड्याच्या मध्यात एखाद्या शुभकार्याला किंवा सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचे योग आहेत. अचानक मोठा खर्च सुद्धा करावा लागेल. कुटुंबाच्या बाबतीत हा बदलाचा काळ असेल. जर तुम्ही कोणाकडून मदतीची अपेक्षा करत असाल, तर तिथून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. घरच्यांची साथ न मिळाल्यामुळे थोडं वाईट वाटेल, पण तुम्ही तुमच्या बुद्धीने या संकटातून बाहेर पडाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध शुभ असेल. वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही एखादं मोठं काम वेळेत पूर्ण कराल. तुमच्या विरोधकांचे प्लॅन फ्लॉप होतील आणि ऑफिसमध्ये तुमचं वर्चस्व वाढेल. लव्ह लाईफ छान राहील आणि जोडीदाराला अजून जवळून समजून घेण्याची संधी मिळेल.लकी कलर: गुलाबी, लकी नंबर: 4

4/7
तूळ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या ताकदीने, बुद्धीने आणि धैर्याने आपली स्वप्न पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुमच्यावर आनंदाचा आणि भाग्याचा वर्षाव होईल. गेले काही दिवस जे प्रश्न तुम्हाला सतावत होते, ते आता सहज सुटताना दिसतील. जुन्या गुंतवणुकीतून आणि बचतीतून फायदा व्हायला सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. ऑफिसमध्ये सहकारी आणि वरिष्ठांची साथ मिळेल.

5/7
तूळ राशीच्या बिझनेस करणाऱ्यांचे मार्केटमध्ये अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. व्यवसायात नफा वाढेल आणि तुमचा उत्साह सुद्धा वाढलेला असेल. जोडीदारासोबत बिझनेस वाढवण्याचे प्लॅन कराल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. उत्तरार्धात सरकारकडून किंवा सत्ताधारी लोकांकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे. घरगुती प्रश्न सुटतील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल, जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. वैवाहिक जीवन सुखी राहील.लकी कलर: पिवळा, लकी नंबर: 4

6/7
वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात छोट्या फायद्यासाठी मोठं नुकसान करून घेऊ नये. परिस्थिती सतत बदलत असल्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. सुरुवातीला नोकरीत थोडा दिलासा मिळेल, पण वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने नाहीय. वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवा आणि विरोधकांपासून सावध राहा. आपलं काम दुसऱ्यावर सोपवू नका, नाहीतर नीट झालेलं काम सुद्धा बिघडू शकतं.

7/7
वृश्चिक - उत्तरार्धात जुनं काम सोडून नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल, पण असा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. पैशांच्या व्यवहारात चोख राहा, नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत चिंतेत भर टाकू शकते. घरगुती वादांमुळे मन अस्वस्थ राहील. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर ताबा ठेवा. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज असतील तर ते वादाऐवजी शांतपणे संवादातून सोडवा.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
वृश्चिक - उत्तरार्धात जुनं काम सोडून नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल, पण असा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या. पैशांच्या व्यवहारात चोख राहा, नाहीतर आर्थिक फटका बसू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत चिंतेत भर टाकू शकते. घरगुती वादांमुळे मन अस्वस्थ राहील. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर ताबा ठेवा. लव्ह लाईफमध्ये काही गैरसमज असतील तर ते वादाऐवजी शांतपणे संवादातून सोडवा.लकी कलर: निळा, लकी नंबर: 3(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement